हैदराबाद : चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडींगची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोट्यवधी भारतीय नागरिकांसह जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेकडं लागलं आहे. इस्रो आज इतिहास घडवणार असून त्याचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. भारताची चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाली, तर दक्षिण ध्रूवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.
Live Updates:
- गायक कैलाश खेर यांनी चंद्रयान ३ च्या लँडिंगपूर्वी एक गाणे भारतीयांना समर्पित केले.
-
- चंद्रयान मोहीम सफल व्हावी यासाठी अमरावतीतील राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अंबादेवी मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
- चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी श्रीनगरमधील हजरतबल दर्गा येथे विशेष प्रार्थना करण्यात आली.
-
- प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी चंद्रयानाला शुभेच्छा दिल्या. आम्हाला या मोहिमेचा खूप अभिमान असल्याचे ते म्हणाले.
-
- केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी दिल्लीतील गुरुद्वारा बांगला साहिब येथे विशेष प्रार्थनेमध्ये भाग घेतला.
-
- भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना पूजा हिरवाडे यांनी 'नमो नमो भारताम्बे' आणि चंद्रायन गीतावर भरतनाट्यम सादर केले. पूजा हिरवाडे म्हणाली, भारतचे चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी मी भरतनाट्यम सादर केले. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे.
-
- चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगसाठी उज्जैनमधील श्री महाकालेश्वर मंदिरात विशेष 'भस्म आरती' करण्यात आली.
-
- चंद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी न्यू जर्सीच्या मनरो येथील ओम श्री साई बालाजी मंदिर आणि सांस्कृतिक केंद्रात प्रार्थना करण्यात आली. सर्व भारतीय समुदायासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आशा आहे, सर्व काही ठीक होईल. चंद्रयान टीमला शुभेच्छा, असं अनिवासी भारतीयांनी म्हटलय.
-
- उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते मोहसिन रझा यांनी बुधवारी लखनौमधील हजरत शाह मीना शाह दर्ग्यात चंद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना केली.
इस्रो घडवणार इतिहास :चंद्रयान 3 मोहीम इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. चंद्रयान 3 या मोहिमेतील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता फक्त त्यांच्या चंद्रावर उतरण्याची प्रतिक्षा तेवढी बाकी आहे. इस्रो आज सायंकाळी 06.04 वाजता इतिहास घडवण्यास सज्ज झालं आहे.