महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 Mission update: चांद्रयानातील पहिला टप्पा १०० टक्के यशस्वी, इस्रोने काय सांगितले? - चांद्रयान सध्या कुठे आहे

चांद्रयान -3 मोहिमेतील यानाच्या स्थितीबाबत इस्रोने महत्त्वाची माहिती दिली आहे. चांद्रयानाचा पहिला टप्पा 100 टक्के यशस्वी झाला आहे. 23 ऑगस्ट रोजी यानाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग होणार आहे.

Chandrayaan 3 Mission update
चांद्रयानातील पहिला टप्पा

By

Published : Jul 16, 2023, 8:05 AM IST

नवी दिल्ली: चांद्रयान-3 मोहिमेत पहिली कक्षा वाढवण्याचे प्रयत्न बंगळुरू येथील इस्रोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) येथे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. अवकाशयान हे सुस्थितीत जात असल्याचे इस्रोने म्हटले आहे. आता 41762 किमी x 173 किमी कक्षेत असल्याची माहिती इस्रोने ट्विट करून दिली आहे.

इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC), बंगळुरू येथून अंतराळ यानाचे बारकाईने निरीक्षण आणि नियंत्रण करण्यात येत आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस उन्नीकृष्णन नायर शनिवारी तिरुअनंतपुरममध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, इस्रोचे शास्त्रज्ञ शनिवारपासून चंद्रयान-3 शी जोडलेल्या ऑनबोर्ड थ्रस्टर्सना सक्रिय करणार आहेत. अंतराळ यानाला पृथ्वीपासून आणखी दूर घेऊन 41 दिवसांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर स्थिर बनविणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी यानाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग होणार आहे.

यानाकडून अत्यंत चांगली कामगिरी -आतापर्यंत प्रक्षेपण यानाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. चांद्रयान-3 साठी आवश्यक असलेले सुरुवातीचे टप्पे अचूकपणे पूर्ण होणार आहेत. इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटवर चांद्रयान-3 हे 14 जुलैला यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. यान हे 2.35 वाजता लिफ्ट-ऑफ झाल्यानंतर 17 मिनिटांनी अचूकपणे अपेक्षित असलेल्या कक्षेत पोहोचले.

शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू- चांद्रयानात पहिला टप्पा शंभर टक्के यशस्वी झाला आहे. अंतराळ यानाची स्थिती चांगली आहे. ते ऑनबोर्ड लॉजिक वापरून चंद्रावर जाण्यासाठी सक्षम आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, या टप्प्यात शास्त्रज्ञ यानाच्या अनेक कक्षा वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत.

चांद्रयान 3 यशस्वी झाल्यास चंद्रावरील माती, रसायने आणि तेथील वातावरणाची माहिती शास्त्रत्रांना उपलब्ध होईल. याशिवाय या उपग्रहाच्या माध्यमातून दिवसा आणि रात्रीच्या भरतीची अधिक माहिती मिळू शकणार आहे- अहमदाबाद इस्रोचे संचालक नीलेश देसाई

मोहिम यशस्वी झाल्यास महत्त्वाची मिळेल-अहमदाबाद इस्रोचे संचालक नीलेश देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, उपग्रहांचे सेन्सर आणि पेलोड अहमदाबादमधील इस्रो केंद्रात तयार केले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरळीत उतरण्यासाठी भरपूर सेन्सर्स आणि पेलोड्सची आवश्यकता असते. चंद्रावरील पृष्टभागावर यानाला सहज आणि यशस्वीपणे उतरण्यासाठी पेलोड खूप उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. रोव्हरची कॅमेरा सिस्टीम, कार्बन अल्टिमीटर सेन्सर, प्रोसेसिंग सिस्टीम, इमेज मेकर अशा 11 वेगवेगळ्या वस्तू बसविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-

  1. Chandrayaan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान
  2. Chandrayaan 3 : इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावले! ; असे झाले प्रक्षेपण, पहा व्हिडिओ
  3. Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी अनेक देशांची इस्रोला मदत करण्याची तयारी: जाणून घ्या काय म्हणाले खगोलशास्त्रज्ञ रमेश कपूर

ABOUT THE AUTHOR

...view details