चेन्नई : इस्त्रोच्या माहितीनुसार मंगळवारी चंद्रावर जाणारे अंतराळयान चांद्रयान 3 यशस्वीरित्या ट्रान्सलुनर कक्षेत पोहोचले आहे. इस्रोने ट्विट केले आहे की, चंद्रयान- 3 पृथ्वीभोवती परिक्रमा पूर्ण करत चंद्राच्या दिशेने निघाले आहे. ISTRAC येथे यशस्वी पेरीजी-फायरिंग करण्यात आले आहे.
ट्रान्सलुनर ऑर्बिट इंजेक्शन ही प्रक्रिया आहे. यामध्ये चंद्राकडे जाणारे अंतराळ यान एका मार्गक्रमणात ठेवले जाते. त्यामुळे यान चंद्रापर्यंत पोहोचू शकणार आहे. इस्रोच्या माहितीनुसार 5 ऑगस्ट 2023 रोजी यानाची LOI प्रक्रिया पार पाडणार आहे. चंद्रयान-3 अंतराळयान 14 जुलै 2023 रोजी भारताच्या हेवी लिफ्ट रॉकेट LVM3 द्वारे कॉपीबुक शैलीमध्ये कक्षेत ठेवण्यात आले आहे. चांद्रयान-3 अंतराळ यानामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल (वजन 2148 किलो), लँडर (1723.89 किलो) आणि रोव्हर (26 किलो) यांचा समावेश असल्याने या मोहिमेचे जगभरात कौतुक होत आहे.
सॉफ्ट लँडिंगची आहे अवघड समस्या: मोहिमेत लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करेल अशी अपेक्षा आहे. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 100 किमी उंचीवरून चंद्रावर उतरणार. प्रत्यक्षात सॉफ्ट लँडिंग ही एक अवघड समस्या आहे. कारण त्यात खडबडीत आणि बारीक ब्रेकिंगसह अनेक जटिल आव्हानांचा समावेश आहे. लँडिंगपूर्वी सुरक्षित आणि धोका शोधण्यासाठी- लँडिंग साइट एरियाचे फ्री एरिया इमेजिंग केले जाणार आहे. सॉफ्ट लँडिंगनंतर, सहा चाकी रोव्हर बाहेर पडणार आहे.
ऑस्ट्रेलियात पीएसएलव्हीचा तुकडा सापडला?-ऑस्ट्रेलियन अंतराळ संस्थेने सोमवारी दावा केला आहे की काही दिवसांपूर्वी त्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली रहस्यमय वस्तू ही भारतीय प्रक्षेपण वाहन पीएसएलव्हीचा तुटलेला हिस्सा असण्याची शक्यता आहे. इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यावर सापडलेली वस्तू पाहिल्याशिवाय आणि त्याची तपासणी केल्याशिवाय आम्ही काहीही पुष्टी करू शकत नाही अथवा नाकारू शकत नाही. सर्वप्रथम, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीला त्या वस्तुचा व्हिडिओ पाठवावा लागेल. त्यावर कुठलीही खूण आहे, हे पाहावे लागते. आवश्यकता भासल्यास इस्रोचे अधिकारी तेथे जाऊन ते भारतीय रॉकेटचा भाग आहे की नाही, हे पाहू शकतात.
हेही वाचा-
- ISRO News: इस्रोने रचला नवा इतिहास, एकाचवेळी प्रक्षेपित केले सात उपग्रह
- Chandrayaan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान
- Chandrayaan 3 : इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावले! ; असे झाले प्रक्षेपण, पहा व्हिडिओ