बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रयान 3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यासह इस्रोनं चंद्रयान 3 मिशनच्या 'लँडर मॉड्यूल'ची कक्षी कमी करुन ते चंद्राच्या आणखी जवळ आणलं. त्यामुळे इस्रोनं अंतिम 'डिबुस्टींग' यशस्वी झाल्याचं स्पष्ट केलं. चंद्रयान 3 हे 23 ऑगस्टच्या सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उरण्याची शक्यता आहे.
इस्रोनं चंद्रयान 3 मॉड्यूलची कक्षा केली कमी :चंद्रयान 3 चंद्राच्या जवळ आणले गेले आहे. त्यामुळे 'लँडर मॉड्यूल'ची कक्षा कमी करण्यात आली आहे. ही कक्षी 25KM x 134Km पर्यंत यशस्वीपणे करण्यात आली आहे. इस्रोनं ठरवून दिलेल्या लँडींग साईटवर 23 ऑगस्टच्या 17.45 च्या सुमारास चंद्रयान 3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करण्यात येईल, अशी माहिती इस्रोनं दिली आहे.
दक्षिण ध्रुवीय प्रदेशात होणार सॉफ्ट लँडिंग :इस्रोनं गुरुवारी चंद्रयान 3 लँडर मॉड्यूल प्रोरल्शन मॉड्यूलपासून वेगळं झालं आहे. 14 जुलैला मिशन लाँच झाल्यानंतर 35 दिवसांनी प्रपोलशन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर लँडर मॉड्यूलचं डिबूस्टींग करण्यात आलं. आता लँडरचं सॉफ्ट लँडींग करण्यासाठी इस्रोचं पथक कामाला लागलं आहे. पेरिल्युन हा चंद्राच्या सगळ्यात जवळचा बिंदू असून तो 30 किमी तर अपोलून हा सगळ्यात दूरचा बिंदू असून तो 100 किमी अंतर आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लँडिंग करण्याची योजना इस्रोनं आखली आहे.