महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 : इस्रोच्या शास्त्रज्ञांची यशस्वी झेप; चंद्राच्या जवळ पोहोचणार चांद्रयान 3, चंद्राची कक्षा भेदण्याची पाचवी पायरी पूर्ण - चंद्राची कक्षा भेदून वर उठण्याची पाचवी पायरी

चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मोठी तयारी केली आहे. चांद्रयान 3 मोहीमेतील पाचवा टप्पा यशस्वी झाला असून चांद्रयान 3 हे 1 ऑगस्टपासून चंद्राच्या दिशेने प्रवास करणार असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.

Chandrayaan 3
चांद्रयान 3

By

Published : Jul 26, 2023, 8:35 AM IST

बंगळुरु :इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 3 बनवण्यासाठी मोठी तयारी केली आहे. त्यामुळेच चांद्रयान 3 यशस्वी झेप घेऊ शकले. बंगळुरु येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 चे यशस्वी उड्डाण करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. यशस्वी उड्डाण केल्यानंतर चांद्रयान 3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचणार आहे. त्यासह चांद्रयान 3 ने चंद्राची कक्षा भेदून वर उठण्याची पाचवी पायरी (Earth-bound perigee firing) पूर्ण केली आहे.

चांद्रयान3 ने पाचवी पायरी केली पूर्ण :इस्रोने मंगळवारी बंगळुरु येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) मधून चांद्रयान 3 अंतराळयानाची पाचवे कक्ष उभारणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यामुळे चांद्रयान 3 हे यशस्वीरित्या चंद्राची कक्षा भेदून वर उठले आहे. चांद्रयान 3 127609 किमी X 236 किमीची कक्षा गाठेल अशी इस्रोच्या शास्ज्ञांना अपेक्षा आहे. पुढील ट्रान्सलुनर इंजेक्शन (TLI) 1 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 1 च्या दरम्यान नियोजित करण्यात आल्याची माहितीही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.

चांद्रयान 1 ऑगस्टला सुरू करेल चंद्राच्या दिशेने प्रवास :चांद्रयान 3 मोहीमेने पाचवी पायरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मात्र आता टीएलआयचे अनुसरण करून चांद्रयान 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा लवकरच संपवणार आहे. अवकाशयान 1 ऑगस्टला चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. त्यासाठी TLI योजना अनुसरुन पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर त्याला चंद्राच्या मार्गावर नेण्यात येईल. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

14 जुलैला सुरु झाली होती चांद्रयान 3 मोहीम :इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 3 मोहीम बंगळुरु येथील सतीष धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलैला लाँच केली होती. त्यानंतर चांद्रयान 3 चे यशस्वी उड्डाण केले होते. चांद्रयान 2 ही मोहीम चंद्रावर लँडींग करताना क्रॅश झाले होते. त्यामुळे चांद्रयान 2 ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. मात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हार न मानता, चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्याचा चंग बांदला आहे. सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग पृष्ठभागाचे संचालन करणे, लँडिंग साइट एक्सप्लोर करण्यासाठी रोव्हर तैनात करणे हे चांद्रयान-3 चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या मिशनद्वारे भारत अंतराळ संशोधनात आपली तांत्रिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. चंद्राच्या भूगर्भशास्त्र, खनिजशास्त्र आणि पृष्ठभागाच्या रचनांबद्दल मौल्यवान वैज्ञानिक डेटा गोळा करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान
  2. Chandrayaan 3 : इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावले! ; असे झाले प्रक्षेपण, पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details