बंगळुरू :भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान 3 14 जुलैला लाँच करणार आहे. त्यापूर्वी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी भगवान यांच्या चरणी लीन होत बालाजीचे दर्शन घेत प्रार्थना केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने चांद्रयान 3 लाँच करण्याची सगळी तयारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी सॉलिड मोटर रिलायझेशनच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सुविधांचे उद्घाटन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.
एसएसएलव्ही खाजगी क्षेत्राकडे करणार हस्तांतरित :श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून चांद्रयान 3 लाँच करण्यात येणार आहे. त्यासाठी एसडीएससी एसएचएआरच्या PSLV, GSLV, LVM3 आणि LV सह प्रक्षेपण वाहनांसाठी घन मोटर्सच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये सॉलिड प्रोपेलेंट प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी 29 प्राथमिक आणि 16 सहायक सुविधांची स्थापना करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इस्त्रोने सोमवारी लहान उपग्रहांच्या वाढत्या मागणीमुळे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. SSLV पृथ्वीच्या कक्षेत 500 किलोपर्यंत वजनाचे उपग्रह ठेवण्यासाठी सेवा बजावते.
व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवा देऊ शकतात योगदान :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( ISRO ) SSLV हे उपग्रह प्रक्षेपणानंतर विकसित केलेले सहावे प्रक्षेपण वाहन होते. SLV-3 हे प्रगत उपग्रह प्रक्षेपण वाहन (ASLV), ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV), जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV) आणि लॉन्च व्हेईकल मार्क-3 (LVM-3) ही इस्त्रोने विकसित केले आहेत. मात्र इंडियन स्पेस असोसिएशन आणि कन्सल्टन्सी फर्म EY इंडिया यांनी एक अहवाल तयार केला आहे. व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवा भारताच्या देशांतर्गत अंतराळ उद्योगात 2025 पर्यंत अर्थव्यवस्थेत 13 अब्ज डॉलरचे योगदान देऊ शकतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पाच प्रमुख सुविधांचे केले अनावरण :चांद्रयान 3 मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून भारतीय संशोधन संस्थेच्या वतीने मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. चांद्रयान मोहिमेच्या सुरुवातीचा टप्पा म्हणून पाच प्रमुख सुविधांचे अनावरण सतीश धवन अंतराळ संशोधन संस्थेत करण्यात आले. एसडीएससी एसएचएआरचे संचालक ए राजराजन यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इस्त्रोच्या विविध विभागाचे संचालक उपस्थित होते.
हेही वाचा -
- Isro sslv launch : इस्रोने देशातील सर्वात लहान रॉकेट SSLV-D1 केले प्रक्षेपित; उपग्रहाशी संपर्क तुटला
- ISRO launches PSLV-C54 Mission : इस्रोने पीएसएलव्ही-सी54 मिशन केले लॉन्च; सहप्रवासी उपग्रह इच्छित कक्षेत