नवी दिल्ली - भारताची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम असलेलं 'चांद्रयान 2' ला चंद्रावर पाण्याचे अंश आढळले आहेत. 'चांद्रयान 2' च्या उपकरणांमध्ये 'इमॅजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर' (IIRS) नावाचे उपकरण आहे. जागतिक वैज्ञानिक डेटा मिळवण्यासाठी 100 किमीच्या ध्रुवीय कक्षेत कार्यरत आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ए.एस. किरण कुमार यांच्या सहकार्याने लिहिलेल्या शोधनिबंधात म्हटलं आहे.
चांद्रयान -२ ने घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करून एक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शोधनिबंधाचे एस एस. किरणकुमार हे सहलेखक आहेत. चांद्रयान -2 ने घेतलेल्या या छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे शोधनिबंधात म्हटलं आहे. तसे पाहिले, तर हे पाणी पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रवाही, बर्फाच्या किंवा वाफेच्या स्वरूपात नाही. तर हे प्लेगियोक्लेज ( plagioclase ) प्रकारच्या खडकांत आहे. या खडकात हायड्रोक्सिल ( OH ) आणि पाणी ( H2O ) यांचे रेणू आढळले आहेत.
'चांद्रयान-1'नेही दिले होते पाण्याचे पुरावे -
देशाचे पहिले चांद्र अभियान, 'चांद्रयान-1'ने चंद्राची काही नवी छायाचित्रे पाठवली होती. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याचे या छायाचित्रांमधून दिसून आले आहे. चंद्राच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याची आपल्याला आधीपासून माहिती आहे. विशेष म्हणजे, पाणी आणि ऑक्सिजनशिवाय लोहाला गंज चढू शकत नाही. त्यामुळे ही छायाचित्रे म्हणजे चंद्रावर पाणी आणि ऑक्सिजनचे अंश असल्याचे संकेत असल्याचा दावा सिंह यांनी केला होता.
भारताचे स्वप्न अधुरे...
'चांद्रयान -2' ला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. पण, त्याच्याशी संबंधातून समोर येणारी माहिती खूप महत्त्वाची आहे. भारताने 22 जुलै 2019 रोजी चंद्रावर आपले दुसरे ‘चांद्रयान-2’ पाठवले होते. मात्र, त्यामधील लँडर 'विक्रम' त्याच वर्षी 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात 'सॉफ्ट लँडिंग' करण्यात अपयशी ठरले. ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर उतरणारा देश बनण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.