महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrababu Naidu 14 Days Remand: चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणीत वाढ, एसीबी कोर्टानं दिली 14 दिवसांची कोठडी - चंद्राबाबू नायडू यांना न्यायालयीन कोठडी

Chandrababu Naidu 14 Days Remand : टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी विजयवाडा येथील लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्र्यांना अटक केल्यानंतर २४ तासांच्या आत कोर्टात हजर करण्यात आलंय. त्यांना न्यायालयानं 14 दिवसांची कोठडी मंजूर केलीय.

Skill Development Scam
चंद्राबाबू नायडू

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 7:29 PM IST

Updated : Sep 10, 2023, 8:05 PM IST

विजयवाडा (आंध्र प्रदेश)Chandrababu Naidu 14 Days Remand : तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना आज कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी 22 सप्टेंबरपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. विजयवाडा एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश हिमाबिंदू यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबूंच्या खटल्यावरील निकाल वाचून दाखवलाय.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी :न्यायमूर्तींनी नायडूयांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिलेत. त्यांना राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात नेण्याची सूचना केलीय. आज सकाळी नायडू यांना कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी विजयवाडा येथील लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अटक केल्यानंतर 24 तासांच्या आत कोर्टात हजर करण्यात (skill development scam former CM TDP Chief) आलंय.

कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक : शनिवारी, चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण आंध्र प्रदेश राज्यात सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoEs) च्या क्लस्टर्सच्या स्थापनेशी संबंधित आहे, ज्याचे एकूण अंदाजित प्रकल्प मूल्य 3300 कोटी रुपये आहे.

तपासात गंभीर अनियमितता :एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, कथित फसवणूकीमुळे राज्य सरकारचं 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय. सीआयडीच्या म्हणण्यानुसार, तपासात गंभीर अनियमितता उघडकीस आलीय. जसं की खाजगी संस्थांद्वारे कोणताही खर्च करण्यापूर्वी, तत्कालीन राज्य सरकारनं 371 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली होती, जी सरकारच्या 10 टक्के वचनबद्धतेचं प्रतिनिधित्व (skill development scam) करते.

पैसा बनावट पावत्यांद्वारे शेल कंपन्यांकडे वळवला : सरकारनं दिलेला बहुतांश पैसा बनावट पावत्यांद्वारे शेल कंपन्यांकडे वळवला गेला, इनव्हॉइसमध्ये नमूद केलेल्या वस्तूंची प्रत्यक्ष डिलिव्हरी किंवा विक्री झाली नाही, असं सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यांनी रिमांड अहवालात म्हटलंय की, आतापर्यंतच्या तपासानुसार, सहा कौशल्य विकास क्लस्टर्सवर खाजगी संस्थांनी खर्च केलेली एकूण रक्कम केवळ एपी सरकार आणि एपी कौशल्य विकास केंद्राने प्रगत निधीतून जमा केलीय.

हेही वाचा :

  1. 'तेलुगु जनता रामोजी रावांसोबत'; चंद्राबाबू नायडूंचा जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप
  2. Skill development case : ३७१ कोटींचं स्किल डेव्हलपमेंट प्रकरण आहे तरी काय, चंद्राबाबू नायडूंना या प्रकरणी झालीय अटक
  3. Chandrababu Naidu Rally : चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, 3 ठार, अनेक जखमी
Last Updated : Sep 10, 2023, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details