चंदीगड : चंदीगड पोलिसांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग (Haryana Sports Minister Sandeep Singh) यांच्याविरुद्ध विविध गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय खेळाडू आणि ज्युनियर महिला प्रशिक्षक यांच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी (Chandigarh Police) क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आयपीसी कलम 354, 354A, 354B, 342 आणि 506 अंतर्गत चंदीगड सेक्टर-26 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय खेळाडू आणि ज्युनियर महिला प्रशिक्षक यांच्या आरोपानंतर हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यासोबतच सर्व आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले. वास्तविक, ज्युनियर महिला प्रशिक्षकाच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. संदीप सिंह म्हणाले की, जोपर्यंत तपास अहवाल येत नाही, तोपर्यंत मी माझे खाते मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले. संदीप सिंह म्हणाले की, माझी प्रतिमा डागाळण्याचे वातावरण तयार केले आहे. मला वाटते की ज्युनियर प्रशिक्षकाने केलेल्या चुकीच्या आरोपांची योग्य चौकशी व्हावी जेणेकरून सत्य बाहेर येईल. तपासानंतर सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.
हे आहे संपूर्ण प्रकरण : हरियाणात नियुक्त राष्ट्रीय खेळाडू आणि कनिष्ठ प्रशिक्षक यांनी हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून विनयभंग केल्याचा आरोप खेळाडूने केला ( allegation of molestation on sports minister ) आहे. पीडितेचा आरोप आहे की, क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी तिच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला होता.