महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेश : 7 नोव्हेंबरला किनारपट्टीच्या भागात वादळाची शक्यता - आंध्र प्रदेश हवामान लेटेस्ट न्यूज

हवामान खात्याने शनिवारी किनारपट्टीच्या आंध्र प्रदेश आणि यनमच्या दुर्गम भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, रविवार, सोमवार आणि मंगळवारी पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले आहे.

आंध्र प्रदेशात वादळाची शक्यता
आंध्र प्रदेशात वादळाची शक्यता

By

Published : Nov 6, 2020, 7:14 PM IST

अमरावती - हवामान खात्याने शनिवारी किनारपट्टीच्या आंध्र प्रदेश आणि यनमच्या दुर्गम भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, रविवार, सोमवार आणि मंगळवारी पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, दुसऱ्या भागात पश्चिम गोदावरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा -मध्य प्रदेश : दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रह्लादला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू

सोमवारी रात्री दहाच्या सुमारास भीमावरममधील काही ठिकाणी अर्धा तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी दुपारनंतरही येथे तासभर पाऊस होऊ शकतो. परंतु, यासंदर्भात कोणताही ठोस अंदाज वर्तविला गेलेला नाही.

'संपूर्ण आंध्र प्रदेशात एक किंवा दोन ठिकाणीच पाऊस पडू शकतो. कधीकधी फक्त 2 ते 5 मिनिटेच पाऊस पडेल, अशीही शक्यता आहे,' असे हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा -जम्मू-काश्मीर : चकमकीदरम्यान एक नागरिक ठार, एका दहशतवाद्याचाही खात्मा

ABOUT THE AUTHOR

...view details