देहराडून : उत्तराखंडमध्ये सात फेब्रुवारीला हिमस्खलन झाल्यामुळे भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध अजूनही सुरू आहे. रविवारी तपोवन बोगद्यातून एनडीआरएफच्या पथकाने या दुर्घटनेतील आणखी एका बळीचा मृतदेह बाहेर काढला. लालकोट गावात राहणाऱ्या धिरेंद्र यांचा मुलगा हर्षा याचा हा मृतदेह असल्याचे सांगण्यात येत आहे.
जोशीमठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुमित बदोनी यांनी सांगितले, की मृतदेहाचे शवविच्छेदन पार पडले आहे. या दुर्घटनेत एकूण २०४ लोक बेपत्ता झाले होते. त्यांपैकी ८२ लोकांचे मृतदेह आढलून आले आहेत. तसेच ३५ मानवी अवयव मिळून आले आहेत. अजूनही तब्बल १२१ जण बेपत्ता आहेत. तसेच आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडले आहेत, त्यांपैकी ४९ जणांची ओळख पटली आहे.