न्यूयॉर्क - गुगल आपल्या जगभरातील 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुगल कर्मचाऱ्यांची छाटणी करणार आहे. याबाबत गुगलचे सीईओ संदर पिचाई यांनी कर्मचार्यांना ईमेल केला आहे. त्यात त्यांनी माझ्याकडे शेअर करण्यासाठी काही वाईट बातम्या असल्याचे स्पष्ट केले आहे. गुगल आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे त्यांनी खेद व्यक्त करत नमूद केले.
कंपनीच्या न्यूज ब्लॉगवर पोस्ट केला मेल :गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना वाईट बातम्या शेअर करत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी याबाबत कंपनीने गेल्या दोन वर्षात नाटकीय पद्धतीची वाढ अनुभवली. मात्र त्याची समिक्षा केल्यानंतर गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना काढण्याची निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यात अल्फाबेट, उत्पादन क्षेत्र, कार्यकारी विभाग, क्षेत्रीय विभागातील कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीची आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी ही छाटणी गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.