नवी दिल्ली - श्रावण महिन्यात उत्तर प्रदेशात सुरू होणाऱ्या कावड यात्रेबाबत सर्वोच्च न्यायालया सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षा घेता राज्य सरकारांनी गंगाजल आणण्याची यात्रेकरूंना परवानगी देऊ नये, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकारला कावड यात्रेची परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले, की कावड यात्रेला उत्तराखंडने परवानगी देऊ नये. कोरोना महामारीची स्थिती पाहता उत्तरांखड सरकारने कावड यात्रा यापूर्वीच स्थगित केली आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेवर कोणतेही निर्बंध लागू केले नाहीत. महामारीची भयावह स्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.
हेही वाचा-प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश...राजस्थानच्या महसूल मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
उत्तर प्रदेश सरकारला कावड यात्रेबाबत पुनर्विचार करण्याची संधी-
न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन यांची अध्यक्षता असलेल्या पीठाने उत्तर प्रदेश सरकारला कावड यात्रेबाबत पुनर्विचार करून सोमवारी न्यायालयात येण्याची सूचना केली आहे. न्यायमूर्ती नरीमन यांनी सरकारच्या वरिष्ठ वकिलांना तोंडी सांगितले, की आम्ही थेट आदेश देऊ की तुम्हाला पुनर्विचार करण्याची संधी देऊ.
हेही वाचा-मुलांकरिता लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात - केंद्राची उच्च न्यायालयात माहिती