नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे देशात कहर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना संसर्गाच्या नवीन घटनांमध्ये वाढ झाली आहे. हळूहळू कोरोनाचा प्रसार शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातही दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने रविवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोना : ग्रामीण अन् अदिवासी भागातील व्यवस्थापनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी - ग्रामीण भागांसाठी मार्गदर्शक सूचना
कोरोनाचा प्रसार शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातही दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने रविवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोना अपडेट
कोरोनाविरोधातील युद्ध अधिक तीव्र करण्यासाठी आणि सर्व स्तरांवर प्राथमिक स्तरावरील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी या भागातील समुदायांना सक्षम करण्याची गरज असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.
- प्रत्येक गावात सर्दी-तापाच्या रुग्णांवर देखरेख ठेवावी. त्यांच्या बरोबरच आरोग्य स्वच्छता आणि पोषण समिती देखील राहावी.
- सर्दी-ताप आणि श्वसनाचा त्रास होणाऱ्यांसाठी प्रत्येक उपकेंद्रात ओपीडी चालवायला हवी. यासाठी वेळ निश्चित करण्यात यावा. कोरोना संशयित समोर आल्यास त्याची चाचणी करण्यात यावी.
- आरोग्य केंद्रांवर तपासणी केल्यानंतर रूग्णाचा चाचणी अहवाल येईपर्यंत त्याला विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात यावा.
- रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांना ट्रेसिंग करा आणि अलगीकरणात ठेवा.
- सुमारे 80 ते 85 टक्के प्रकरणात लक्षणे किंवा फारच कमी लक्षणे आढळतात. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. घरी किंवा कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना विलगीकरणात ठेवण्यात यावे.
- कोरोना रूग्णाची ऑक्सिजनची पातळी तपासणे फार महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावात ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर असावेत.
- फ्रंटलाइन कामगार, स्वयंसेवक आणि शिक्षकांनी विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची वारंवार माहिती घ्यावी. यादरम्यान संक्रमण टाळण्यासाठी सर्व उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे.
- जर रुग्णाची ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांपेक्षा कमी झाली. तर त्याला त्वरित आरोग्य केंद्रात पाठवावे जेथे ऑक्सिजन बेडची सुविधा असेल.
- आयसोलेशनमध्ये कोणती खबरदारी घ्यावी, यासंबधित एक पत्रक रुग्णांला द्यावे. त्यात औषधे, देखरेखी इत्यादींचीही माहिती द्यावी. तसेच प्रकृती बिघडल्यास एक संपर्क क्रमांक देखील द्यावा.
हेही वाचा -भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन लस प्रभावी