चेन्नई (तामिळनाडू) : केंद्र सरकारने चेन्नईतील मरीना बीचवर करुणानिधी यांचे स्मारक उभारण्यास मंजुरी दिली आहे. तमिळनाडू सरकारने दिवंगत द्रविड मुनेत्र कळघम (DMK) अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या सन्मानार्थ समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 360 मीटर अंतरावर स्मारक बांधण्याच्या प्रस्तावास केंद्राने मंजूरी दिली आहे. एक फूटब्रिज बांधण्याचा प्रस्ताव होता. त्याचवेळी, या महिन्याच्या सुरुवातीला, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल (EIA) केंद्र सरकारच्या तज्ञ मूल्यांकन समितीला (EAC) सादर केला. या अहवालाच्या आधारे राज्य सरकारकडे स्मारक बांधण्याची परवानगी मागितली होती.
परिसरात कोणतेही बांधकाम होणार नाही : केंद्राच्या तज्ञ मूल्यमापन समितीचे अध्यक्ष दीपक अरुण आपटे यांच्या नेतृत्वाखालील 12 सदस्यीय EAC ने 0.8 किमी दूर असलेल्या INS Adnar च्या ना-हरकत प्रमाणपत्रासह 15 अटींसह मंजुरीची शिफारस केली आहे. तसेच, कोणतेही मलबा किंवा बांधकाम साहित्य जलकुंभात टाकले जाऊ नये, याशिवाय प्रवेश नियंत्रित मार्गावरील अभ्यागतांच्या व्यवस्थापनावर कडक देखरेख ठेवली पाहिजे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर कासवांचे वास्तव्य असलेल्या परिसरात कोणतेही बांधकाम होणार नाही आणि समुद्राच्या परिसरातून भूजल काढू नये, तसेच प्रकल्प राबविताना तज्ज्ञांची देखरेख समिती स्थापन करावी असही यामध्ये सुचवण्यात आले आहे.