महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शक्तिकांत दासच राहणार आरबीआयचे गव्हर्नर; तीन वर्षांसाठी कार्यकाळ वाढवला - तीन वर्षांसाठी कार्यकाळ वाढवला

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) घेतलेल्या निर्णयानुसार दास, तामिळनाडू केडरचे IAS अधिकारी यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. ते गेल्या वर्षी आर्थिक व्यवहार सचिव म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांना 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य बनवण्यात आले.

शक्तिकांत दास
शक्तिकांत दास

By

Published : Oct 29, 2021, 8:31 AM IST

नवी दिल्ली - केंद्र मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवला आहे. शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 पर्यंत होता. तो आता आणखी वाढवण्यात आला आहे.

शक्तिकांत दास यांची डिसेंबर २०१८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत. ते आता पुढील तीन वर्षे किंवा पुढील आदेशापर्यंत पदावर राहणार आहेत. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) घेतलेल्या निर्णयानुसार दास, तामिळनाडू केडरचे IAS अधिकारी यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. ते गेल्या वर्षी आर्थिक व्यवहार सचिव म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांना 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य बनवण्यात आले. शक्तिकांत दास यांना शासनाच्या विविध क्षेत्रांतील कामांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत.

हेही वाचा -नाशिक : 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ..असे असतील कार्यक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details