महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 23, 2021, 10:18 PM IST

ETV Bharat / bharat

कधी होणार सीबीएससी बारावी बोर्डाची परीक्षा? केंद्र सरकारने 25 मे पर्यंत राज्यांकडून मागितल्या सूचना

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य शिक्षण मंत्री आणि सचिवांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत बारावी परीक्षासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्य सरकारांना 25 मे पर्यंत या संदर्भात सविस्तर सूचना पाठविण्याच्या सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

बारावी परीक्षा
बारावी परीक्षा

नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे शैक्षणिक वेळापत्रक पूरते कोलमडले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य शिक्षण मंत्री आणि सचिवांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत बारावी परीक्षासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्य सरकारांना 25 मे पर्यंत या संदर्भात सविस्तर सूचना पाठविण्याच्या सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात सुचित आणि सामूहिक निर्णयापर्यंत पोहोचण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निशंक यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्यांचे शिक्षण मंत्री आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव यांनीही बैठकीत भाग घेतला होत. दोन तासांहून अधिक काळ ही बैठक चालली. बारावीच्या बोर्डाच्या प्रलंबित परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांविषयी चर्चा बैठकीत झाली. सीबीएससी बारावी बोर्डाच्या परीक्षा कशा घ्याव्यात? प्रत्येक राज्याची तयारी आणि परिस्थिती काय? याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार अत्यंत अर्थपूर्ण बैठक झाली. मौल्यवान सूचना प्राप्त झाल्या. मी राज्य सरकारांना २ मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याची विनंती केली आहे. विश्वास आहे की १२ वीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात एक ठोस आणि सामूहिक निर्णयापर्यंत पोहोचू. शक्य तितक्या लवकर अंतिम निर्णय घेण्यात येईल. लवकरच विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील अनिश्चितता दूर करण्यात येईल, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं.

बैठकीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सहभागी -

केंद्रीय मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीत, राज्यातील कोरोना परिस्थिती आणि मुलांची मानसिक तयारी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडयांनी माहिती केले. राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते. विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करणे, त्यांना परीक्षेसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, मानसिक तयारी असणे गरजेचे आहे, असेही गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे.

12 वीची परीक्षा घेण्यास केजरीवाल सरकारचा विरोध -

दिल्ली सरकार सीबीएसईतर्फे 12 वीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास अनुकूल नाही. विद्यार्थ्यांना लस न देता बारावी बोर्डाची परीक्षा घेणे ही मोठी चूक असल्याचे सिद्ध होईल, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं.

परिक्षा रद्द -

महत्त्वाचे म्हणजे 14 एप्रिल रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची 12 वीची बोर्ड परीक्षा तहकूब करण्यात आली होती. तर दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षा 4 मे ते 14 जून या कालावधीत घेण्यात येणार होत्या.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. एकतर परीक्षा रद्द करावी, अन्यथा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थीनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details