महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Supreme Court On Demonetisation : नोटबंदीचा केंद्राचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारच्या बाजूने निकाल - न्यायमूर्ती एस ए नझीर

( Supreme Court On Demonetisation ) केंद्र सरकारने (Central Government) 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या (Demonetisation) निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने 2016 ची नोटाबंदी वैध ठरवली आहे. यासोबतच न्यायालयाने सर्व 58 याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. 4 न्यायाधीशांनी बहुमताने निर्णय दिला आहे. ( Central Secision Of Demonetisation Right )

Supreme Court  On Demonetisation
नोटबंदीचा केंद्राचा निर्णय योग्यच

By

Published : Jan 2, 2023, 12:17 PM IST

नवी दिल्ली :सन २०१६ मध्ये एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ( Supreme Court hearing )पार पडली. न्यायमूर्ती एस. ए. नझीर ( Justice SA Nazir ) यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने आज नोटाबंदीवर निकाल जाहीर ( Result announced on Demonetisation ) केला आहे. नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.(Central Secision Of Demonetisation Right )

नोटबंदीबाबत निर्णय जाहीर : केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी हा निर्णय घेताना एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. हिवाळ्याच्या सुट्टीनंतर न्यायालयाचे कामकाज आजपासून पुन्हा सुरू होत असून पहिल्याच दिवशी नोटबंदीबाबत निर्णय जाहीर करण्यात आला. न्यायालयानं नोटबंदीविरोधातील सर्वच्या सर्व 58 याचिका फेटाळून लावत केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 7 डिसेंबर रोजी केंद्र आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यांना 2016 मध्ये 1000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयाशी संबंधित रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, अशा निर्णयांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी न्यायालयाला नियम तयार करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती.

नोटाबंदीचे फायदे : (Benefits of demonetisation)केंद्राने आपल्या उत्तरात असेही म्हटले आहे की नोटाबंदीमुळे बनावट नोटांचे प्रमाण कमी होणे, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ, बेहिशेबी उत्पन्न शोधणे असे अनेक फायदे झाले आहेत. केवळ ऑक्टोबर 2022 मध्ये 730 कोटींचे डिजिटल व्यवहार झाले, म्हणजेच एका महिन्यात 12 लाख कोटी रुपयांचे व्यवहार नोंदवले गेले. जे 2016 मध्ये 1.09 लाख व्यवहार म्हणजे सुमारे 6952 कोटी रुपये होते. ( supreme court decision on 2016 Demonetisation )

सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल :2016 मध्ये विवेक शर्मा यांनी याचिका दाखल करून सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यानंतर आणखी 58 याचिका दाखल झाल्या. आतापर्यंत केवळ तीन याचिकांवर सुनावणी सुरू होती. आता सर्वांची एकत्रित सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 16 डिसेंबर 2016 रोजीच घटनापीठाकडे सोपवण्यात आले होते, परंतु त्यानंतर खंडपीठाची स्थापना होऊ शकली नाही. 15 नोव्हेंबर 2016 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश टीएस ठाकूर ( Justice TS Thakur ) यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले होते.

सरन्यायाधीश म्हणाले होते :नोटाबंदीच्या योजनेमागील सरकारचा हेतू प्रशंसनीय आहे. आम्हाला आर्थिक धोरणात ढवळाढवळ करायची नाही, पण लोकांच्या होणार्‍या गैरसोयीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी सरकारला या मुद्द्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते.

प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवले :16 डिसेंबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरकारच्या नोटाबंदी योजनेत अनेक कायदेशीर चुका असल्याचा युक्तिवाद केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले. त्यानंतर सरकारच्या या निर्णयावर कोणताही अंतरिम आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. तेव्हाही न्यायालयाने नोटाबंदीच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यास स्थगिती दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details