नवी दिल्ली: आधार जारी करणारी संस्था यूआयडीएआय ने सर्व नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. यात म्हणले आहे की, सार्वजनिक संगणकावरून आधार डाउनलोड करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशा लोकांना हे माहित असणे आवश्यक आहे की जर त्यांनी सार्वजनिक संगणकावरून आधार डाउनलोड केला असेल तर त्यांनी आधारची प्रिंट किंवा सॉफ्ट कॉपी घेतल्यावर संगणकावरुन ती कायमची हटवावी.
यूआयडीएआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक अलर्ट आणि चेतावणी जारी केली आहे. त्यात असे म्हटले आहे की जर तुम्ही सार्वजनिक संगणक किंवा सायबर कॅफेमधून आधारची प्रत डाउनलोड केली तर तुम्हाला त्या संगणकात डाउनलोड केलेला आधारची प्रत काढल्यावर ती कायमची हटवली पाहिजे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण - यूआयडीएआयने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा इशारा जारी केला आहे कारण अलीकडे आधारचा गैरवापर करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आधार कार्ड वर एक प्रत्येकाचा युनिक १२ अंकी क्रमांक असतो, आधार सध्या देशातील बहुतांश अत्यावश्यक सेवांसाठी अनिवार्य झाले आहे आणि यासाठी लोकांना पोर्टलवर अनेक सुविधाही मिळत आहेत.
पण अशा ठिकाणी आधारची पूर्ण प्रत देण्याऐवजी लोकांनी मास्क केलेले आधार कार्ड वापरावे. मास्क केलेले आधार कार्ड असे आहेत जे यूआयडीएआय साइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते त्यात तुमच्या आधारचे पूर्ण 12 अंक दाखवत नाहीत. यामध्ये फक्त शेवटचे चार अंक दाखवलेले असतात.
हेही वाचा : CYBER ATTACKS : सायबर हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करा