महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सरकारी यंत्रणेचा गैरवापर अन् माध्यमांकडून सरकारचा एकतर्फी प्रचार'

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मशाल मिरवणूक काढली. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्याशी संवाद साधला.

योगेंद्र यादव
Yogendra Yadav

By

Published : Jan 1, 2021, 7:57 AM IST

नवी दिल्ली -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांचे आंदोलन सुरूच आहे. गाझीपूर सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मशाल मिरवणूक काढली. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींने सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्याशी संवाद साधला. यावेळी योगेंद्र यादव यांनी सरकावर टीका केली.

माजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांची मुलाखत

सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला असून माध्यमांनीही एकतर्फी सरकारसाठी प्रचार केला आहे. शेतकर्‍यांबद्दल बर्‍याच गोष्टी पसरवल्या गेल्या. हे शेतकरी आंदोलन अत्यंत शांततेत आणि अहिंसेच्या मार्गाने सुरू आहे. आंदोलनातील काही शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल रोष आहे. 4 जानेवारीला चर्चेतून तोडगा निघाला नाही. तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आंदोलनाला राष्ट्रीय आकार देण्याची गरज आहे. तसेच हे आंदोलन केवळ उत्तर भारतापुरते मर्यादित आहे हे खरे नाही, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्याची 4 जानेवरीला सरकारसोबत चर्चा -

दिल्ली दंगल, कोरोना अशा संकटाखाली 2020 हे वर्ष काढल्यानंतर आज देशवासियांनी नवा संकल्प घेत, नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्याचबरोबर, दिल्ली सीमेवरील कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी आंदोलन सतत 36 दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी केंद्र सरकारसोबत शेतकरी संघटनांनी 5 तास चर्चा केली. यातून वीज बिल आणि इतर काही मुद्यांवर सहमती झाल्याची माहिती आहे. पुढील बैठक 4 जानेवरीला होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details