महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'डीपफेक'ला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकार आणणार नवे नियम - अश्विनी वैष्णव

Deepfake Technology : आजकाल 'डीपफेक' तंत्रज्ञान खूप चर्चेत आलं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीचे डीपफेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यावर उपाय म्हणून आता केंद्र सरकार यासंबंधी नवीन नियम आणणार आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 3:59 PM IST

Deepfake Technology
Deepfake Technology

नवी दिल्ली Deepfake Technology : केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'डीपफेक' तंत्रज्ञान लोकशाहीसाठी नवीन धोका असल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकार लवकरच याला सामोरं जाण्यासाठी नवीन नियम आणणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

नवीन नियम तयार केले जातील : अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी 'डीपफेक'च्या मुद्द्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींची भेट घेतली. ते म्हणाले की, कंपन्यांनी 'डीपफेक' शोधणं, त्यांच्याशी व्यवहार करणं, त्यांच्या अहवाल यंत्रणा मजबूत करणं आणि वापरकर्त्यांमध्ये जागरूकता वाढवणं यासारख्या स्पष्ट कृती करण्यास सहमती दर्शविली आहे. वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितलं की, 'आम्ही आजच नियमावलीचा मसुदा तयार करण्यास सुरुवात करू आणि काही काळातच 'डीपफेक'ला सामोरं जाण्यासाठी नवीन नियम तयार केले जातील.

नवा कायदाही आणला जाऊ शकतो : ते पुढे म्हणाले की, हे नियम सध्याच्या चौकटीत सुधारणा करून किंवा नव्या कायद्याच्या स्वरुपातही असू शकतात. वैष्णव म्हणाले की, 'आमची पुढील बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत आज झालेल्या निर्णयांवर अधिक चर्चा होईल. याशिवाय मसुद्यात काय समाविष्ट केलं पाहिजे यावरही चर्चा केली जाईल.

'डीपफेक' म्हणजे काय : 'डीपफेक' म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून, फोटो किंवा व्हिडिओमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या जागी दुसरं कोणीतरी दाखवणे. यात इतकं साम्य असतं की खऱ्या आणि खोट्यात फरक करणं खूप अवघड जातं. 'डीपफेक' हा शब्द कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रकारातून आला आहे. हे तंत्रज्ञान बनावट मीडिया तयार करण्यासाठी आणि व्हिडिओ व इतर डिजिटल सामग्रीमध्ये चेहरे बदलण्यासाठी वापरलं जातं. डीपफेक केवळ व्हिडिओपुरतंच मर्यादित नाही, तर या तंत्रज्ञानाचा वापर बनावट फोटो आणि ऑडिओमध्ये देखील केला जाऊ शकतो.

हेही वाचा :

  1. Misused Of Deepfake System : डीपफेक प्रणालीचा सर्वाधिक गैरवापर पॉर्न इंडस्ट्रीत
  2. Deepfake technology : काय आहे 'डीपफेक तंत्रज्ञान'; जाणून घ्या कसे करते कार्य
  3. रश्मिका मंदान्ना डीपफेक वादानंतर केंद्र सरकार गंभीर, सोशल मीडिया दिग्गजांना चर्चेसाठी आमंत्रण

ABOUT THE AUTHOR

...view details