महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2022, 12:25 PM IST

ETV Bharat / bharat

Safety Audit Of Ropeway : केंद्र सरकारला आली जाग! रोपवे दुर्घटनेनंतर 'सेफ्टी ऑडिट' करण्याचे आदेश

रोपवे दुर्घटनेनंतर आता केंद्र सरकार जागे झाले आहे. या दुर्घटनेनंतर आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रत्येक रोपवे प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट करण्यास सांगितले आहे. (Central Government Orders Safety Audit) गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहले आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

नई दिल्ली: झारखंडमधील देवघर रोपवे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना प्रत्येक रोपवे प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट करण्यास आणि अशा आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मानक कार्यपद्धती लागू करण्यास सांगितले आहे. (Ropeway Accident) गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहले आहे. प्रत्येक रोपवे प्रकल्पासाठी एक देखभाल पुस्तिका आणि वेळापत्रक असावे जेणेकरून सुरक्षा व्यवस्था मानक पद्धतींनुसार असेल असही ते यामध्ये म्हणाले आहेत.

ऑडिट करण्यासाठी कंपनीची नियुक्ती करावी - पत्रात त्यांनी म्हटले, आहे की रोपवे चालवणाऱ्या संस्थेने देखभाल कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्व उपक्रमांची नोंद ठेवावी. 'राज्य सरकारने प्रत्येक रोपवे प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट करण्यासाठी अनुभवी आणि पात्र कंपनी किंवा संस्थेची नियुक्ती करावी असही ते यामध्ये म्हणाले आहेत. (Safety Audit Of Ropeway Project) रोपवे चालवणाऱ्या संस्थेने ऑडिटमध्ये आलेल्या सर्व समस्या हाताळल्या पाहिजेत.

बीआयएस मानकांचे काटेकोरपणे पालन करावे - झारखंडच्या देवघर जिल्ह्यात रविवारी दुपारी रोपवे तुटल्याने केबल कारने वाचवताना तीन जणांचा मृत्यू झाला. सोमवारपासून भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने ६० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. गृह सचिव म्हणाले, की रोपवे प्रकल्पांच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी निर्धारित केलेल्या बीआयएस मानकांचे काटेकोरपणे पालन केले पाहीजे असही ते म्हणाले आहेत.

सुरक्षा ऑडिटची व्यवस्था करावी - ते म्हणाले, की या संदर्भात आवश्यक मार्गदर्शन राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ (NHIDCL) कडून घेतले जाऊ शकते. जी भारत सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत नोडल संस्था आहे. भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या संबंधित राज्यांमधील सर्व रोपवे प्रकल्पांच्या स्थितीचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, रोपवेच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी एसओपी, आकस्मिक योजना आणि सुरक्षा ऑडिटची व्यवस्था करावी असही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Russia-Ukraine War 49Th Day : रशियाची लष्करी कारवाई आमचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत सुरू राहील -पुतीन

ABOUT THE AUTHOR

...view details