नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी पंजाब दौरा झाला. त्या दौऱ्यात सुरक्षेत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामध्ये सुरक्षेच्या नियमात झालेल्या उल्लंघनाबाबत केंद्र सरकारने पंजाब सरकारकडून तपशीलवार कारवाईचा अहवाल मागवला आहे. सरकारी सूत्रांनी रविवारी सांगितले की, पंजाब सरकारला गृह मंत्रालयामार्फत (MHA) पत्र पाठवण्यात आले आहे, ज्यात चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तपशीलवार कारवाईचा अहवाल मागवला आहे.
चुकीच्या अधिकार्यांच्या विरोधात कारवाई : केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पंजाबचे मुख्य सचिव विजय कुमार जंजुआ यांना पंजाब सरकारने चुकीच्या अधिकार्यांच्या विरोधात कारवाई करण्यात दिरंगाई अधोरेखित करणारा कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवाल लवकरात लवकर शेअर करण्याचे संकेत देणारे पत्र या महिन्याच्या सुरुवातीला पाठवण्यात आले होते. त्यावर आता केंद्र स्थारावर तपासले जाणार असून, त्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. तसेच, यामध्ये त्रुटी आढळल्या तेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे याला वेगळे वळण दिले गेले असही बोलले गेले आहे.