नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदने गुरुवारी 24 भांडवल संपादन प्रस्तावांसाठी मंजुरी दिली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी सहा, हवाई दलासाठी सहा, नौदलासाठी 10 आणि तटरक्षक दलासाठी दोन प्रस्तावांचा समावेश आहे. एकूण 84,328 कोटी रुपयांचे प्रस्ताव (Center approves proposals for armed forces) आहेत. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, नवीन श्रेणीच्या क्षेपणास्त्र प्रणाली, लांब पल्ल्याच्या उच्च-स्फोटक वॉरहेड्स, पारंपारिक वारहेड्ससाठी श्रेणी वाढवणारी किट आणि प्रगत पाळत ठेवणारी यंत्रणा समाविष्ट करून भारतीय वायुसेना अधिक प्राणघातक क्षमतेसह अधिक बळकट केली जाईल.
नौदलाची क्षमता :मंत्रालयाने सांगितले की, भारतीय सैन्याला अधिक प्लॅटफॉर्म आणि उपकरणे जसे की लढाऊ वाहने, हलके टँक आणि माउंटेड गन सिस्टम सुसज्ज करण्याची तयारी सुरू (Center Approves Proposals) आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, या यादीमध्ये आमच्या सैनिकांसाठी अधिक चांगल्या संरक्षण पातळीसह बॅलिस्टिक हेल्मेट खरेदीचा देखील समावेश आहे. नौदलाची जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, बहु-भूमिका जहाजे आणि उच्च-सहनक्षम स्वायत्त वाहनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीमुळे नौदलाची क्षमता आणि सागरी शक्ती आणखी (proposals for armed forces) वाढेल.