केरळमधील 90 वर्षीय महिलेचे चित्र प्रेम कालिकत (केरळ) : घराच्या भिंतीवर पोस्ट करणे हा या वृद्ध महिलेचा छंद आहे. याद्वारे ती वय हा फक्त एक आकडा आहे. आपल्या ईच्छा आकांक्षा कधी वृद्ध होत नाहीत हे सिद्ध करण्याचे काम ही महिला करत आहे. यासाठी तिला तिच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबाही मिळत आहे.
चित्रकला हा तिच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग : ही महिला कायम काहीतरी करत असते. वेगवेगळे चित्र काढणे तिचा छंद आहे. यामध्ये भिंतीवर पोस्ट बनवने, इतर काही चित्र काढणे असे तीचे छंद आहेत. आणि ही या महिलेसाठी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तिच्या घराच्या भिंतींवर अनेक प्रकारची गोंडस चित्रे पाहू शकते. सध्या शंभराहून अधिक चित्रे तिने काढले आहेत. चित्रकला हा तिच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग आहे. ती सकाळीच चित्र काढायला सुरुवात करते.
कलाकृतीची आणि वयाची चर्चा : चित्र काढताना प्रथम, ती पेन्सिलने सुरुवात करते. नंतर तिला पेंट करायच्या असलेल्या प्रतिमेला विविध प्रकारचे रंग देतात. आणि तिच्या पेंटिंगचे वैशिष्ठ्य म्हणजे ती क्युटेक्स वापरते. आणि आयलाइनर देखील ती वापरते.तिला देवांची, फुलांची आणि पक्ष्यांची चित्रे काढायची आवड होती. या महिलेला दहा मुले होती. मात्र, आज घडीला त्यापैकी फक्त पाचच जिवंत आहेत. आयुष्यात दु:ख आहे मात्र, ते दु:ख बाजूला सारून ती तिच्या कल्पनेला जीवन देत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तीच्या या कलाकृतीची आणि वयाची चर्चा होत असते.
वृद्धत्त्वाविषयक शास्त्रातील तज्ज्ञ : वयावरून केल्या जाणाऱ्या याच भेदभावाला मानसशास्त्रात 'एजिझम' म्हणतात. हा भेदभाव वयाविषयीच्या पूर्वग्रहबाधित दृष्टीमुळे केला जातो. मराठीत 'एजिझम'ला 'वयवाद' म्हणतात. रॉबर्ट बटलर या अमेरिकी जेरंटोलॉजिस्टनं (वृद्धत्त्वाविषयक शास्त्रातील तज्ज्ञ) १९६९ मध्ये पहिल्यांदा 'एजिझम' ही संज्ञा वापरली. सुरुवातीला ही संज्ञा वापरताना त्यांच्या डोळ्यासमोर केवळ वयस्कर लोक होते. पुढे एजिझममध्ये तरुणांचाही विचार करण्यात आला. तरुणांच्या वयवादाला 'रिव्हर्स एजिझम' (उलट वयवाद) म्हटले आहे.
हेही वाचा :मी माझ्या लोकांसोबत चाललो! राहुल गांधींना अश्रू अनावर; ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा समारोप