महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CDS Bipin Rawat Last Rites : CDS बिपिन रावत पंचत्वात विलीन.. मुलींनी दिला मुखाग्नी, संरक्षण दलाकडून 17 तोफांची सलामी - जनरल रावत यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

CDS Bipin Rawat Last Rites
CDS Bipin Rawat Last Rites

By

Published : Dec 10, 2021, 3:03 PM IST

Updated : Dec 10, 2021, 5:12 PM IST

17:02 December 10

जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम, लष्कराकडून 17 तोफांची सलामी, मुलींनी दिला मुखाग्नी

जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम देण्यात आला आहे. यावेळी लष्कराने 17 तोफांची सलामी दिली आहे. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मुलींनी मुखाग्नी दिला. जनरल बिपीन रावत यांना दोन मुली आहेत. एक विवाहित असून ती मुंबईत राहते. तीही दिल्लीत पोहोचली आहे. दुसऱ्या मुलीचे अद्याप लग्न झालेले नाही आणि ती तिच्या आई-वडिलांसोबत दिल्लीतच राहते.

16:51 December 10

राजनाथ सिंह यांची जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली, अंत्यसंस्कारासाठी तिन्ही दलाचे प्रमुख हजर

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. थोड्याच वेळात बिपीन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी देशाच्या तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख स्मशानभूमीत हजर आहेत.

16:06 December 10

जनरल रावत यांच्या सम्मानार्थ 17 तोपांची सलामी.. 800 जवान तैनात

सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat ) सह कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत बळी गेलेल्या 13 अधिकाऱ्यांवर आज अंतिम संस्कार केले जात आहेत. जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव आज बेस हॉस्पिटलमधून त्यांच्या सरकारी निवासस्थानी आणण्यात आले. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. जनरल बिपिन रावत यांच्या मुलींनी साश्रूपूर्ण नयनांनी आपल्या पित्याला शेवटचा निरोप दिला. जनरल रावत यांच्या सम्मानार्थ 17 तोपांची 800 जवान सलामी देण्यात येणार आहे.

16:06 December 10

ब्रिगेडियर एल एस लिड्डर यांच्यावर दिल्ली कँट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅश (Coonoor helicopter crash) मध्ये निधन झालेले ब्रिगेडियर एल एस लिड्डर (Brigadier L S Lidder ) यांच्यावर दिल्ली कँट (Delhi Cantt) मध्ये सरकारी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

15:56 December 10

बिपिन रावत व पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत दाखल

दिल्ली - CDS General Bipin Rawat आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत दाखल झाले आहे. त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली आहे.

15:37 December 10

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांच्या मृत्यूबद्दल अपमानास्पद करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश - कर्नाटक मुख्यमंत्री

विकृत मनाच्या काही लोकांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांच्या मृत्यूबद्दल अपमानास्पद, उत्सवपूर्ण संदेश ट्विट केले आहेत. पोलिस प्रमुखांना या घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, हवेरीमध्ये

15:14 December 10

केंद्रीय मंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची CDS बिपिन रावत यांना श्रद्धांजली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी CDS बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर अन्य केंद्रीय मंत्र्यांनी व अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

14:59 December 10

रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी.. बिपिन रावत अमर रहे ची नारेबाजी, पाहा व्हिडिओ

दिल्लीत अंत्ययात्रा सुरू असताना नागरिकांनी "जब तक सूरज चांद रहेगा, बिपिन जी का नाम रहेगा" चा नारा दिला. अंत्ययात्रा कॅन्टोन्मेंटमधील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीकडे जात आहे.

14:50 December 10

जनरल रावत यांची अंत्ययात्रा सुरु, थोड्याच वेळात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार होणार

जनरल रावत यांची दिल्लीत अंत्ययात्रा सुरु आहे, थोड्याच वेळात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.

14:41 December 10

जनरल रावत यांची अंत्ययात्रा सुरू.. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील 13 जणांवर होणार अंत्यसंस्कार

तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव काल मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं गेलं. शुक्रवारी जनरल रावत यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.

Last Updated : Dec 10, 2021, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details