महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CDS Anil Chauhan : नवीन CDS अनिल चौहान यांनी पदभार स्वीकारला - General Bipin Rawat dies in helicopter crash

देशाचे नवनियुक्त सीडीएस ( Newly appointed CDS ) निवृत्त ले. जनरल अनिल चौहान ( Retired Lieut General Anil Chauhan ) यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

CDS Anil Chauhan
CDS Anil Chauhan

By

Published : Sep 30, 2022, 1:55 PM IST

नवी दिल्ली : देशाचे नवनियुक्त सीडीएस ( Newly appointed CDS ) निवृत्त ले. जनरल अनिल चौहान ( Retired Lieut. General Anil Chauhan ) यांनी आज पदभार स्वीकारला आहे. तत्पूर्वी त्यांनी दिल्लीतील युद्ध स्मारकावर पोहोचून अमर जवान ज्योती, युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील सुरेंद्र सिंह चौहानही ( Surendra Singh Chauhan ) उपस्थित होते. चौहान यांना दोन दिवसांपूर्वीच नवीन सीडीएस बनवण्यात आले आहे. जनरल बिपिन रावत ( General Bipin Rawat ) यांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू ( General Bipin Rawat dies in helicopter crash ) झाल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी त्यांची नवीन सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शहिदांना श्रद्धांजली वाहिली - वॉर मेमोरियल येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर निवृत्त ले. जनरल अनिल चौहान म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलातील ( Indian Armed Forces ) सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळताना मला अभिमान वाटतो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ( Chief of Defense Staff ) या नात्याने मी तिन्ही संरक्षण दलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आम्ही सर्व आव्हाने आणि अडचणींना एकत्रितपणे सामोरे जाऊ.

ABOUT THE AUTHOR

...view details