महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Robbery Of Businessman: ट्राफिक सिग्नलवर व्यावसायिकाची लुट ; व्हिडिओ आला समोर, बेधडकपणे राजधानीत चोरीच्या घटना - राजधानीत चोरीच्या घटना

मंगळवारी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे एका व्यापाऱ्याला चार लाख रुपये लुटल्याप्रकरणी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले (Robbery of Businessman in Delhi) आहे. या फुटेजमध्ये चोरट्यांनी व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या कारमधून ४ लाख रुपये घेऊन पळ काढला हे स्पष्टपणे दिसत (CCTV footage of robbery) आहे. महिंद्रा पार्क पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करत (traffic signal Jahangirpuri Delhi) आहेत.

Robbery From Businessman
लुटमारीचा व्हिडिओ समोर

By

Published : Dec 26, 2022, 2:06 PM IST

दिल्लीत व्यावसायिकाकवर दरोडा

नवी दिल्ली : राजधानीच्या जहांगीरपुरी येथील ट्रॅफिक सिग्नलजवळ दरोड्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर आले (Robbery of Businessman) आहे. मंगळवारी दुचाकीस्वार हल्लेखोरांनी युनिट व्यावसायिकासह चार लाखांचा ऐवज लुटला होता. या घटनेत चोरट्यांनी व्यावसायिकाला गोळ्या घालून दरोडा टाकून पळ काढला. समोर आलेल्या फुटेजमध्ये दरोडेखोर घटना करताना स्पष्ट दिसत आहेत. सध्या महिंद्रा पार्क पोलीस ठाणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. बेधडकपणे राजधानीत चोरीच्या घटना घडत (CCTV footage of robbery) आहेत.

हल्लेखोरांनी गोळीबार :खरे तर, मजलिस पार्कमध्ये राहणारा इशान अग्रवाल मंगळवारी संध्याकाळी घरी परतत असताना जांगीड गुर्जर ट्रॅफिक सिग्नलजवळ त्याच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार (Robbery of Businessman in Delhi) केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे समोर आले आहे की, नरेला येथूनच चोरटे व्यावसायिकाचा पाठलाग करत होते. त्यानंतर त्यांनी त्याला मुकरबा चौकाजवळ गाडी थांबवून खाली उतरण्यास सांगितले. यावर व्यावसायिकाने गाडीचा वेग वाढवला आणि जहांगीरपुरीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, सिग्नलवरील लाईट लाल असल्याने त्यांनी गाडी थांबवली, तिथे काही वेळाने चोरटेही पाठलाग करत (traffic signal Jahangirpuri Delhi) पोहोचले.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज : यानंतर चोरट्यांनी कारची काच फोडण्याचा प्रयत्न सुरू (CCTV footage of robbery in Delhi) केला. त्यांना पाहताच एका वाहनचालकाने मध्यस्थी केली असता चोरट्यांनी त्याच्याकडे पिस्तूल दाखविले, या भीतीने तो पुन्हा गाडीत बसला. काही वेळानंतर चोरट्यांनी व्यावसायिकावर गोळ्या झाडून जखमी केले आणि कारच्या मागील सीटवर ठेवलेली सुमारे चार लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढला. घटनेनंतर लोकांनी जखमी अवस्थेत व्यावसायिकाला मॅक्स रुग्णालयात दाखल केले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर हेच लक्षात येते की, किती बेधडकपणे उपराजधानीत चोरीच्या घटना घडत आहेत. सध्या पोलीसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी या फुटेजच्या आधारे रेखाचित्र तयार केले असून इतर सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. महिंद्रा पार्क पोलीस ठाणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत (robbery of businessman near traffic signal) आहेत.

पुण्यातील घटना :पुणे वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना अज्ञात पाच चोरट्यांनी कोयत्याने मारहाण करून २२ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. ही घटना 22 डिसेंबरला गुरुवारी संध्याकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी योगेश विनायक हिंगे यांनी अज्ञात ५ आरोपींविरोधात भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात इसम आले होते. त्यांनी सिक्युरिटी गार्ड भरत परिहार यास हाताला पकडून हिंगे काम करीत असलेल्या कार्यालयात आणून कॅश द्या, कॅश द्या, असे ओरडत व शिवीगाळ करत आरोपींनी हिंगे व आणखी तीन कामगारांना व सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली होती. दरम्यान, सर्वांना गंभीर व किरकोळ दुखापत करून जवळ असलेली २१ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम दरोडा टाकून पळून घेऊन गेले.

ABOUT THE AUTHOR

...view details