नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केले जाणार आहे. या संदर्भातील माहिती सर्व प्रथम शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर सीबीएसई बोर्ड आपल्या अधिकृत वेबसाइट (cbse.gov.in) हे वेळापत्रक अपलोड करेल. यासह सीबीएसईच्या ट्विटर हँडलवर (CBSE Twitter) देखील इयत्ता 10 आणि 12च्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक पाहता येणार आहे.
सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक आज होणार जाहीर - केंद्रीय शिक्षण मंडळ
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २८ जानेवारी रोजी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) चर्चा करण्यासाठी हा ऑनलाइन वेबिनार झाला होता.
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २८ जानेवारी रोजी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) चर्चा करण्यासाठी हा ऑनलाइन वेबिनार झाला होता. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली होती.
पोखरियाल यांनी यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे २०२१ रोजी सुरू होणार आहेत. १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा संपणार आहेत. १५ जुलै २०२१ पर्यंत सीबीएसई परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.