नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. एक नोटीस जारी करून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून घेतली जाणार आहे. याचे डेटशीट ( CBSE Term 2 Exam Datesheet ) अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
दुसऱ्या सत्राच्या परीक्षा उर्वरित 50 टक्के अभ्यासक्रमासाठी घेतली जाईल. सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी दुसऱ्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
CBSE इयत्ता 10वी पहिल्या सत्राची परीक्षा 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात आली होती. तर इयत्ता 12वीची परीक्षा 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.