महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीबीएससीची दहावीची परीक्षा रद्द; तर बारावीची परीक्षा लांबणीवर

१ जूनला बोर्डातर्फे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीबीएससीच्या दहावीची परिक्षा रद्द
सीबीएससीच्या दहावीची परिक्षा रद्द

By

Published : Apr 14, 2021, 2:22 PM IST

Updated : Apr 14, 2021, 4:23 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सीबीएससीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर ४ ते १४ जून दरम्यान होणारी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १ जूनला बोर्डातर्फे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यता आला आहे. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण सचिव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर एक निवेदन जारी करत निर्णयाची माहिती देण्यात आली.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी...

अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जाईल. जर विद्यार्थी मूल्यांकनावर समाधानी नसतील तर, परिस्थिती सामान्य झाल्यास परीक्षा देऊ शकतात.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी...

4 मे ते 14 जून या कालावधीत होणार्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 1 जून रोजी आणखी एक बैठक होणार असून, त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. जर परीक्षा घेण्याचा निर्णय होणार असले. तर विद्यार्थ्यांना 15 दिवस अगोदर माहिती दिली जाईल.


हेही वाचा -देशातील विद्यापीठांच्या शिखर संघटनेची बैठक; पंतप्रधान मोदींनी केले संबोधित

Last Updated : Apr 14, 2021, 4:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details