नवी दिल्ली -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 12 वाजता जाहीर झाले आहेत. हा निकाल विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर कळू शकणार आहे.
कोरोना महामारीमुळे सीबीएसईने दहावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. सीबीएसईने दहावीच्या परीक्षेचे निकाल हे मूल्यांकन काढून निश्चित केले आहेत. मुल्यांकनावर आधारित दहावीच्या परीक्षेचे निकाल विद्यार्थ्यांना www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in किंवा www.cbse.gov.in या वेबसाईटवर पाहता येतात. परीक्षेचे निकाल डिजी लॉकरलाही अपलोड करण्यात आलेले आहेत.