हैदराबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला ( Cbse 10th 12th result 2022 ) आहे. विद्यार्थी DigiLocker आणि CBSE अधिकृत वेबसाइट www.cbse.gov.in, www.cbseresult.nic.in ला भेट देऊन परीक्षेचा निकाल पाहू शकतात. CBSE इयत्ता 10 चा निकाल हा 94 टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा 1.41 टक्क्यांनी जास्त मुलींचा निकाल लागला आहे.
शामली येथील दिया देशात अव्वल - CBSE बोर्डाने शुक्रवारी 12वी आणि 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. दुसरीकडे, शामली जिल्ह्यातील स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूलची 10वीची विद्यार्थिनी दिया नामदेव 100% गुण मिळवून राष्ट्रीय टॉपर बनली आहे. दिया नामदेव हिने 10वीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवत देशात अव्वल क्रमांक पटकवला आहे.
मे-जून मध्ये झाली होती परीक्षा -कोविड-19 संसर्गामुळे यावर्षी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती. ज्यामध्ये पहिल्या टर्मची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तर दुसऱ्या टर्मची परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात आली होती.
पंतप्रधानांनी केले स्वागत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CBSE बोर्डात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ट्वीट करुन नापास झालेल्या विद्यार्थ्यांप्रती आपल्या सदभावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणालेकी. काही विद्यार्थी त्यांच्या निकालावर खूश नसतील परंतु त्यांना हे माहित असले पाहिजे की एक परीक्षा ते कोण आहेत हे कधीही परिभाषित करणार नाही. मला खात्री आहे की त्यांना आगामी काळात आणखी यश मिळेल. तसेच या वर्षीचे पीपीसी शेअर करत आहोत जिथे आम्ही परीक्षांशी संबंधित पैलूंवर चर्चा केली.
हेही वाचा -Droupadi Murmu Become President : द्रौपदी मुर्मू विजयी, मोदी-शाह जोडी पुन्हा हीट, एनडीएच्या बाहेरचीही मते मिळाली