महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 3, 2023, 6:09 PM IST

Updated : Apr 3, 2023, 6:53 PM IST

ETV Bharat / bharat

PM Narendra Modi on CBI : देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची महत्त्वाची जबाबदारी - पंतप्रधान मोदी

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)च्या हीरक महोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, सीबीआयवर मोठी जबाबदारी आहे. सीबीआयवर जनतेचा विश्वास आहे.

Prime Minister Modi
Prime Minister Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (3 एप्रिल) सांगितले की, व्यावसायिक आणि कार्यक्षम संस्थांशिवाय विकसित भारत घडवणे शक्य नाही आणि त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयवर मोठी जबाबदारी आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI)हीरक महोत्सवी समारंभाला पंतप्रधान मोदी बोलत होते. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि न्यायाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे सांगून ते म्हणाले की, भारताला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची प्रमुख जबाबदारी आहे.

लोकांमध्ये विश्वास निर्माण केला : ते म्हणाले की, सरकारने मिशन मोडमध्ये काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात कारवाई सुरू केली आहे. मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांशिवाय आम्ही भ्रष्टाचाराच्या कारणांवरही लढत आहोत. आजही जेव्हा एखाद्या प्रकरणाची उकल होत नाही तेव्हा ते सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सीबीआयने आपल्या कामातून आणि तंत्राने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, यावर त्यांनी भर दिला आहे.

सीबीआय न्यायासाठी एक ब्रँड म्हणून उदयास आले : कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नये हीच देशाची आणि नागरिकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'सीबीआयने सर्वसामान्य नागरिकांना आशा आणि बळ दिले आहे. सीबीआय न्यायासाठी एक ब्रँड म्हणून उदयास आल्याने लोक सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, जनतेचा सीबीआयवर पूर्ण विश्वास आहे.

सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्यांचा गौरव : भ्रष्टाचार हा विकासातील मोठा अडथळा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी देशात अनेक भ्रष्टाचार झाले. सीबीआय अधिक मजबूत करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि सीबीआयचे सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्यांचा गौरव केला. यावेळी सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींचा जामीन १३ एप्रिलपर्यंत वाढवला, ३ मे रोजी पुढील सुनावणी

Last Updated : Apr 3, 2023, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details