नई दिल्ली:श्रद्धा हत्याकांडात पोलिसांना मोठा यश मिळाले आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला आज सोमवार (दि. 26 जानेवारी)रोजी त्याच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्यात आले. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत त्याला दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांना श्रद्धा आणि आफताब पूनावाला यांच्यातील कथित वादाची ऑडिओ क्लिप मिळाली असून त्यानंतर आफताबच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड केले आहेत. (Shraddha murder case) अफतापला त्याच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्यासाठी (CFSL)मध्ये नेण्यात आले होते.
अनेक घडामोडींचा शोध -पॉलिग्राफ चाचणी आणि नार्को चाचणी पूर्ण झाल्यानंतर दिल्ली पोलीस श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबच्या आवाजाचे नमुने गोळा करत आहेत. दिल्ली पोलिसांनी आफताबचे व्हॉट्सअॅप संदेश आणि व्हॉईस रेकॉर्डिंग मिळवले आहे, त्यानंतर ते आता सीएफएसएल लॅबमध्ये त्याच्या आवाजाच्या नमुन्यांशी जुळले जातील की नाही हे पाहत आहेत. आवाजाच्या नमुन्याशी मिळालेल्या रेकॉर्डिंगची जुळवाजुळव केल्यानंतर श्रद्धा खून प्रकरणाशी संबंधित अनेक घडामोडींचा शोध घेता येईल, अशी आशा पोलिसांना आहे.