दिल्ली:अबकारी धोरण प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी सकाळी 11 वाजता बोलावले, सीबीआयच्या कार्यालयात हजर होण्यास बजावले आहे. याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या तुरुंगात आहेत. आता केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावल्याने हा घोटाळ्यात केजरीवाल अडकणार तर नाही? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता केजरीवालांना बोलावले:अबकारी धोरण प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर होण्यास अरविंद केजरीवाल यांना सांगण्यात आले आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अबकारी धोरण प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असताना आता केजरीवालांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. GNCTD च्या उत्पादन शुल्क धोरणाची रचना आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या चालू तपासात ईडी आणि सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली होती. सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया यांना अटक केली. नंतर 9 मार्च रोजी, तिहार तुरुंगात काही तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली.
ऑक्टोबरमध्ये, दिल्लीच्या जोरबाग स्थित मद्य वितरक इंडोस्पिरिट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर ईडीने दिल्ली आणि पंजाबमधील जवळपास तीन डझन ठिकाणी छापे टाकून त्याला अटक केली होती. सीबीआयनेही या आठवड्याच्या सुरुवातीला या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल केले.