महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CBI Officer Suicide Delhi सीबीआय अधिकाऱ्याने गळफास लावून दिल्लीत राहत्या घरी केली आत्महत्या - cbi officer committed suicide delhi

डिफेन्स कॉलनीतील हुडको प्लेसमध्ये गुरुवारी सकाळी सीबीआय अधिकाऱ्याने आत्महत्या CBI officer commits suicide केली. 48 वर्षीय जितेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी बाल्कणी येथे बेल्टला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला CBI officer body found at HUDCO Place घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये त्याने 'मी मरत आहे आणि माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही' असे लिहिले आहे.

CBI Officer Suicide Delhi
सीबीआय अधिकाऱ्याने गळफास लावून दिल्लीत राहत्या घरी केली आत्महत्या

By

Published : Sep 2, 2022, 1:34 PM IST

नवी दिल्ली :डिफेन्स कॉलनीतील हुडको प्लेसमध्ये गुरुवारी सकाळी सीबीआय अधिकाऱ्याने आत्महत्या CBI officer commits suicide केली. 48 वर्षीय जितेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी बाल्कणी येथे बेल्टला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला CBI officer body found at HUDCO Place घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये त्याने 'मी मरत आहे आणि माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही' असे लिहिले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आत्महत्येची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

सीबीआय अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे गूढ कायम :पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र कुमार दिल्लीतील हुडको प्लेस येथे राहत होते. ते सीबीआयमध्ये उप विधी सल्लागार म्हणून कार्यरत होते. येथे ते एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुले हिमाचल प्रदेशातील मंडी येथे राहतात. सकाळी ७.४५ च्या सुमारास पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जितेंद्र कुमार यांचा मृतदेह बाल्कनीत पाईपच्या साहाय्याने बेल्टला लटकलेला यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

जितेंद्र यांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबातील सदस्यांची विचारपूस : जितेंद्रचा भाऊ चंदीगड आणि त्याची पत्नी मंडी हिमाचल प्रदेशातून दिल्लीत आले आहेत. सर्वांची चौकशी केल्यानंतर आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. शुक्रवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हेही वाचा :बीएसएफने अमृतसरच्या भारत पाकिस्तान सीमेवरून संशयास्पद तरुणाला केली अटक

ABOUT THE AUTHOR

...view details