नवी दिल्ली - बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेहुल चोक्सीच्या फसवणुकीचा नवा प्रकार ( CBI files case against Mehul Choksi ) समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) सोमवारी सांगितले, की 2014-18 दरम्यान 22 कोटी रुपयांची इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (IFCI) फसवणूक केल्याप्रकरणी फरारी व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याची कंपनी गीतांजली जेम्स यांच्यावर आरोप दाखल केले आहेत.
चोक्सीच्या हद्दपारीला स्थगिती-13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणात सीबीआय आणि ईडीला भारतात हवा असलेला चोक्सी गेल्या वर्षी 23 मे रोजी डॉमिनिका येथून ( cheating on Mehul Choksi ) बेपत्ता झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम ( who is Mehul Choksi ) राबविण्यात आली. त्याला 26 मे रोजी डॉमिनिका येथे पकडण्यात आले होते. डोमिनिकन कोर्टाने चोक्सीच्या वकिलांनी दाखल केलेल्या बंदी प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर त्याच्या हद्दपारीला स्थगिती दिली होती.