महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Delhi Liquor Scam: दिल्ली दारू घोटाळ्यात सीबीआयने दाखल केले आरोपपत्र, मात्र आरोपपत्रात सिसोदियांचे नाव नाही - दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शुक्रवारी दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Scam) पहिले आरोपपत्र दाखल केले. (CBI files charge sheet in Delhi liquor scam). यामध्ये 7 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

Delhi Liquor Scam
Delhi Liquor Scam

By

Published : Nov 25, 2022, 8:35 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Scam) केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय न्यायालयात दोन सरकारी सेवकांसह सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. (CBI files charge sheet in Delhi liquor scam). यामध्ये विजय नायर, अभिषेक बोईनापल्ली, समीर महेंद्रू, अरुण रामचंद्र पिल्लई, मुथू गौतम, उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त कुलदीप सिंह आणि उत्पादन शुल्क विभागाचे सहायक आयुक्त नरेंद्र सिंह यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र त्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव नाही आहे.

10,000 हून अधिक पानांचे आरोपपत्र सादर : CBI ने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7A आणि 8 अंतर्गत तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 120B अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याबद्दल 10,000 हून अधिक पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. विशेष न्यायाधीश एमके नागपाल या खटल्याची सुनावणी करत आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हे प्रकरण 30 नोव्हेंबरला राखून ठेवले आहे. कोर्ट त्या दिवशी आरोपपत्राची दखल घेऊ शकते. यानंतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की अरुण रामचंद्र पिल्लई विजय नायर यांच्यामार्फत आरोपी लोकसेवकाला देण्यासाठी महेंद्रूकडून अवाजवी आर्थिक फायदा घेत असे. अर्जुन पांडेने एकदा नायरच्या वतीने महेंद्रूकडून सुमारे 2-4 कोटी रुपयांची मोठी रोख रक्कम घेतली होती.

केजरीवालांनी म्हणत आहेत प्रकरण खोटे : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणावर ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सीबीआयच्या आरोपपत्रात मनीषचे नाव नाही, कारण हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. रेडमध्ये काहीही सापडले नाही. 800 अधिकाऱ्यांना 4 महिने तपासात काहीही मिळाले नाही. मनीषने शिक्षण क्रांतीच्या माध्यमातून देशातील करोडो गरीब मुलांना चांगल्या भविष्याची आशा दिली आहे. अशा व्यक्तीला खोट्या प्रकरणात अडकवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले.

भाजपच्या इशाऱ्यावरून आरोप : आपचे राज्य संयोजक आणि मंत्री गोपाल राय म्हणाले की, सीबीआयने दारू घोटाळ्यात दाखल केलेल्या आरोपपत्राने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या आरोपांना काही आधार नव्हता. राय म्हणाले की, सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक मनीष सिसोदियाचे नाव नाही. दारू घोटाळ्याबाबत त्यांच्यावर जे काही आरोप झाले, ते सर्व छापे भाजपच्या इशाऱ्यावरच टाकण्यात आले, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

19 ऑगस्ट रोजी सीबीआयचा छापा : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 27 सप्टेंबर रोजी विजय नायरच्या रूपात पहिली अटक केली. विजय नायर हे मनोरंजन आणि इव्हेंट मीडिया कंपनीचे माजी सीईओ आहेत. ईडीने त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरही छापे टाकले. 19 ऑगस्ट रोजी सकाळी सीबीआयने गोवा, दमण दीव, हरियाणा, दिल्ली आणि यूपीसह 7 राज्यांमध्ये अनेक नोकरशहा आणि व्यावसायिकांच्या ठिकाणांवर 20 इतर ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही सीबीआयने छापा टाकला होता. सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी सिसोदिया यांच्यासह 15 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणी सीबीआयने 10 ऑक्टोबर रोजी अभिषेक बोईनापल्लीला अटक केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details