पाटनाः केंद्रीय अन्वेषण विभागाने ( CBI ) रेल्वे रॅक ( Wagons ) वाटपात मनमानी पद्धतीने आर्थिक व्यवहार केल्याचे पुढे आले आहे. सीबीआयने यामध्ये मोठी कारवाई करत भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या ( IRTS ) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक ( CBI arrested IRTS officials ) केली आहे. मनमानी पद्धतीने रेल्वे रॅक वाटपात भ्रष्टाचार उघडकीस ( Corruption case in ECR Sonpur division ) आल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. ही बाब पूर्व मध्य रेल्वे ( ECR ) हाजीपूर मुख्यालयाशी संबंधित आहे. या प्रकरणात सीबीआयने सापळा रचून सीएफटीएमला ( CBI lays a trap and arrests CFTM taking bribe ) 6 लाख रुपयांची लाच घेताना पकडले. एवढेच नाही तर लाच देणार्यालाही पकडण्यात आले.
सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये मुख्य माल वाहतूक व्यवस्थापक म्हणून IRTS अधिकारी संजय कुमार (1996 बॅच), ईसीआरमध्ये, समस्तीपूरमध्ये नियुक्त रुपेश कुमार (2011 बॅच) आणि सोनपूरमध्ये नियुक्त असलेले सचिन मिश्रा (2011 बॅच) यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांवर रेल्वे वॅगन वाटप करताना ईसीआर विक्रेत्यांकडून नियमित लाच घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणी कोलकात्याच्या आभा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नवल लढा यांच्याशिवाय मनोज कुमार साहा नावाच्या आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. मनोज कुमार साहा देखील पश्चिम बंगालशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआयने एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर केले आहे.