हैदराबाद ( तेलंगणा ) : परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नुकतेच येथील कॅसिनोचे आयोजक आणि एजंटांवर छापे टाकले. या संदर्भात एजन्सीने तपास तीव्र केला आहे. कॅसिनो ऑपरेटर ट्विच प्रवीणच्या डीलची ईडीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाच जणांना नोटीस बजावली आहे.( hyderabad Casino organizer Praveens farmhouse ) ( telangana Praveens farmhouse reminiscent a zoo ) (ED raids Praveens farmhouse ) ( farmhouse resembling zoo in Rangareddy )
अनेकांना पाठवले पैसे :कॅसिनो एजंट प्रवीण आणि माधव रेड्डी यांच्यासह फ्लाइट ऑपरेटर संपत आणि इतर दोन हवाला एजंटना नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्वांना सोमवारी ईडी कार्यालयात होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रवीण आणि माधवरेड्डी यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 25 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आणले आहेत. प्रवीण आणि माधव रेड्डी यांच्या खात्यातून अनेक राजकारणी आणि अधिकार्यांकडे पैसे हस्तांतरित झाल्याचे तपासात उघड झाले आहे.