हैदराबाद- कोरोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच तिसऱ्या लाटेची धास्ती निर्माण झाली आहे. अशातच डेल्टा प्ल्स या कोरोनाच्या नव्या रुपामुळे चिंता वाढली आहे. डेल्टा प्लसचे तीन राज्यांत ३० हून अधिक रुग्ण आढळले आहे.
महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण
कोरोनाच्या संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या डेल्टा प्ल्सचे महाराष्ट्रात २१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. डेल्टा प्ल्सचे रत्नागिरीत ९ तर मुंबईत २ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक डेल्टा प्ल्सचा रुग्ण आढळला आहे. जळगावात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले आहेत.
कोरोना डेल्टा प्लसच्या रुग्णांचे वाढते प्रमाण हेही वाचा-खासदार नुसरत जहाँ यांच्या विवाहाचा प्रश्न पोहोचला थेट संसदेत!
डेल्टा प्लसमुळे मध्य प्रदेशमध्ये पहिला बळी, ७ रुग्ण
डेल्टा प्लसमुळे देशात रुग्णाचा पहिला मृत्यू हा मध्य प्रदेशमध्ये झाला. मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. भोपाळमध्ये ५ तर उज्जैनमध्ये २ असे कोरोनाच्या नवीन प्रकाराचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार डेल्टा प्लसची लागण झालेल्या लोकांमधील ४ जणांने लसीकरण झालेले आहे. त्या रुग्णांची तब्येत स्थिर आहे.
हेही वाचा-नवनीत राणांना दिलासा! सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचे जात प्रमाणपत्राबाबतचे आदेश स्थगित
केरळमध्ये ४ वर्षाच्या मुलांसह तीन जणांना कोरोनाचा संसर्ग
केरळमधील पथनमथिट्टाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षाच्या मुलामध्ये डेल्टा प्लसचा संसर्ग आढळला आहे. पलक्कडमध्ये या नव्या कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अधिक संसर्ग होऊ नये, याकरिता दोन जिल्ह्यांत प्रशासनाने पावले उचलली आहेत.
हेही वाचा-शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक नव्या आघाडीसाठी नव्हती - यशवंत सिन्हा
काय आहे डेल्टा प्लस व्हेरियंट?
भारतात सर्वप्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी. १.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून विषाणूचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट तयार झाला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही, हे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू आहे.
कोरोना विषाणू हा वारंवार आपले रुप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. भारतातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावं देण्यात आली होती. यामधील डेल्टा स्ट्रेनचा 'डेल्टा प्लस' हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा या व्हेरिएंटवर कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता असल्याचे डॉ. शीतल वर्मा यांनी म्हटले आहे. त्या केजीएमयूमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.
डेल्टा प्लसने तिसऱ्या लाटेचा धोका-
डॉ. वर्मा यांनी सांगितले, की भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेला हा डेल्टा (बी.१.६१७.२) व्हॅरिएंटच कारणीभूत होता. आता दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली, तरी डेल्टा व्हॅरिएंटही 'डेल्टा प्लस' मध्ये रुपांतरीत झाला आहे. जर लोकांनी आवश्यक ती खबरदारी नाही बाळगली, तर या व्हॅरिएंटमुळेच देशात तिसरी लाटही येऊ शकेल. दुसऱ्या लाटेमध्ये उपचारासाठी वापरण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिवीर आणि स्टेरॉईड थेरपी अशा उपचारांचा परिणाम नंतर दिसून आला नाही. त्यामुळे ही उपचार पद्धती आता बंद करण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला होता.
तिसऱ्या लाटेबाबत एम्सचा इशारा-
महाराष्ट्र टास्क फोर्सने कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्यानंतर एम्सनेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. जर कोरोनाच्या काळात योग्य नियमांचे पालन करणे व गर्दी टाळणे नाही केल्यास कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाने ४७ वेळा बदलले रुप..
महाराष्ट्रात केलेल्या संशोधनानुसार, तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची वेगवेगळी रुपं पहायला मिळाली. प्लाझ्मा, रेमडेसिवीर आणि स्टेरॉईडयुक्त औषधांच्या अतीवापरामुळे कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात म्युटेशन झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. यामुळेच दुसऱ्या राज्यांमध्येही सीक्वेन्सिंग करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), आयसीएमआर आणि दिल्लीतील एनसीडीसी यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे.