इस्लामाबाद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर शनिवारी इस्लामाबादच्या रॅलीत पोलीस, न्यायव्यवस्था आणि इतर सरकारी संस्थांना धमकावल्याबद्दल दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा Case Registered Against Imran Khan दाखल करण्यात आला. या संदर्भातील माहिती रविवारी उजेडात आली. यापूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी रविवारी सांगितले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर राज्य संस्थांना धमकावणे आणि रॅलीत प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी सरकार गुन्हा नोंदविण्याचा विचार करत आहे.
इस्लामाबादमधील मरगल्ला पोलिस ठाण्यातशनिवारी रात्री १० वाजता खानविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, खान यांच्या भाषणामुळे पोलिस, न्यायाधीश आणि देशात भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली. शनिवारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी उच्च पोलीस अधिकारी, एक महिला दंडाधिकारी, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती.
गेल्या आठवड्यात देशद्रोहाच्या आरोपाखालीअटक करण्यात आलेला आपला सहकारी शाहबाज गिल यांच्याशी झालेल्या वागणुकीवरून त्याने हा इशारा दिला होता. सनाउल्लाह यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आपल्या भाषणांमध्ये लष्कर आणि इतर संस्थांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांनी आपला प्रचार सुरू ठेवला आहे. ते म्हणाले की, गृह मंत्रालयाने खान यांच्या नवीन भाषणाचा अहवाल तयार केला आहे आणि पुढील काही दिवसांत या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महाधिवक्ता आणि कायदा मंत्रालयाशी सल्लामसलत करत आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानातील मीडिया वॉचडॉगने माजी पंतप्रधान खान यांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण सर्व उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली होती.