मुंबई : मुंबई पोलिसांनी 10 महिलांसह 17 परदेशी नागरिकांवर वर्क व्हिसाशिवाय दहिसरमध्ये बॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेतल्याने गुन्हा दाखल केला आहे. (Foreigners Working Without Visa in Mumbai). मुंबई पोलीसांच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. (foreigners booked for working without visa).
Foreigners Working Without Visa : बिना व्हिसा काम करणाऱ्या 17 परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल - working without visa in mumbai
या परदेशी नागरिकांवर परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (foreigners booked for working without visa). त्यांना तशी नोटीस बजावण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
विविध देशांचे 17 लोकं : दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील म्हणाले, "तक्रार मिळाल्यानंतर आम्ही दहिसरमधील कोकणी पाडा परिसरात एक टीम पाठवली. तेथे आम्हाला अनेक परदेशी लोक एका चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत असे आढळून आले. आम्ही त्या सर्वांची कागदपत्रे तपासली. त्यापैकी काही लोकं हे बेकायदेशीरपणे काम करत असल्याचे आढळले. यांपैकी विविध देशांचे 17 लोकं असे होते ज्यांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केले होते. या परदेशी लोकांना एका तस्कराने गोव्यातून आणले होते. आता हे तस्कर देखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत. एका आघाडीच्या बॉलीवूड प्रॉडक्शन हाऊसने त्यांना आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी आणले होते ज्याचे शूटिंग दहिसर येथे सुरू होते.
गुन्हा दाखल : या परदेशी नागरिकांवर परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना तशी नोटीस बजावण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. मुंबई काँग्रेसच्या मनोरंजन उद्योग शाखेचे कार्यवाह नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. नाईक म्हणाले, "दहिसर येथील एल पी शिंगटे फिल्म स्टुडिओमध्ये गोव्यातून अनेक परदेशी लोक एका चित्रपटाचे शूटिंग करत असून त्या लोकांकडे योग्य वर्क व्हिसा नाही असे आम्हाला समजले. त्यामुळे आम्ही पोलिसांशी संपर्क साधला."