महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कव्वालविरुद्ध गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल.. - Qawwal Sharif Parwaz comment on india

देशाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका कव्वालविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रीवामध्ये आयोजित उर्स मेळ्यात कव्वाली गाताना कव्वाल शरीफ परवाजने भारताबद्दल भाष्य केले होते. याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

case filed against Qawwal in Rewa
कव्वाल शरीफ परवाज रीवा

By

Published : Mar 31, 2022, 1:08 PM IST

रीवा (म.प्र) -देशाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणे एका कव्वालला महागात पडले आहे. रीवामध्ये आयोजित उर्स मेळ्यात कव्वाली गाताना कव्वाल शरीफ परवाजने भारताबद्दल भाष्य केले होते. याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

कव्वालचा व्हिडिओ

हेही वाचा -Big B Watch RRR at rishikesh : अमिताभ बच्चन यांनी ऋषीकेश येथे पाहिला RRR चित्रपट

कव्वाली दरम्यान केली आक्षेपार्ह टिप्पणी :रीवा येथील मनगवा येथे दरवर्षी उर्स मेळा भरतो. येथे अन्वर शाहच्या समाधीवर चादर अर्पण केली जाते. दरवर्षीप्रमाणे या वेळीही कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमासाठी कानपूरमधील शरीफ परवाज आणि मुझफ्फरपूरमधील सनम वारसी या दोन कव्वाली गायकांना आमंत्रित करण्यात आले होते. कव्वालने सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख केला. नंतर तो म्हणाला की, 'इनका तो कहीं पता ही नहीं चलता, ऐसे में गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का भी पता नहीं चलेगा' असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल :कव्वालकडून भरलेल्या व्यासपीठावरून भारताबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार पंचू लाल प्रजापती हेही उपस्थित होते. स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी उर्स मेळ्याचे आयोजक आणि कव्वाल शरीफ परवाज यांच्याविरुद्ध भा.दं.वीच्या कलम 153, 502 आणि 298 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे.

हेही वाचा -An Uncontrollable Elephant : पिसाळलेल्या हत्तीमुळे उडाली खळबळ; बघा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details