बेंगळुरू : अहमदाबादहून बेंगळुरूला जाणार्या आकासा एअर फ्लाइट मध्ये धूम्रपान केल्याच्या आरोपावरून राजस्थानमधील प्रवीण कुमार नावाच्या प्रवाशाला बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तो मंगळवारी अहमदाबाद येथे विमानात बसला होता. प्रवासा दरम्यान तो शौचालयात गेला आणि तेथे त्याने धूम्रपान केले, असे पोलिसांनी सांगितले.
विमानाने प्रथमच प्रवास करत होता : प्रवीण कुमार मंगळवारी दुपारी 1.10 वाजता अहमदाबादहून आकाश एअरलाइन्सच्या QP - 1326 द्वारे बंगळुरूला पोहोचला. फ्लाइट अटेंडंट्सने त्याच्यावर त्वरीत कारवाई करत त्याला पकडले आणि बेंगळुरूला पोहोचल्यावर पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीदरम्यान, प्रवाशाने पोलिसांना सांगितले की, तो प्रथमच फ्लाइटने प्रवास करत होता आणि त्याला नियमांची माहिती नव्हती. रेल्वे प्रवासादरम्यान तो टॉयलेटमध्ये धुम्रपान करत असे आणि विमानातही त्याने तोच प्रयत्न केला. इतरांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अहमदाबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या आकासा एअर फ्लाइट QP1326 मधील एक प्रवासी विमानाच्या शौचालयात धुम्रपान करताना आढळला. आमच्या क्रूने आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले आणि बेंगळुरूमध्ये उतरल्यावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या मदतीने प्रवाशाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आम्ही या प्रकरणाच्या तपासात अधिकाऱ्यांना मदत करत आहोत. - प्रवक्ते, आकासा एअर
फ्लाइटमध्ये महिला प्रवाशाला विंचू चावला :नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना एप्रिलमध्ये घडली होती. एअर इंडियाने याबाबतची ताजी माहिती दिली आहे. महिला प्रवाशाला नंतर डॉक्टरांकडे नेण्यात आले आणि तिच्यावर उपचार करण्यात आले, असे एअरलाइनने सांगितले. डॉक्टरांनी पुढील उपचार करून महिला प्रवाशाला डिस्चार्ज दिला. या घटनेनंतर एअर इंडियाच्या इंजिनीअरिंग टीमने विमानाची पाहणी केली असता विंचू सापडल्याचे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Adani Hindenburg Case : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी सेबीला तीन महिन्यांची मुदतवाढ
- Narendra Modi To Visit Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी जपान, ऑस्ट्रेलियासह जाणार चार देशांच्या दौऱ्यावर
- NIA Raids On Gangsters Nexus Case : गँगस्टर खलिस्तानी टेरर प्रकरणी दिल्ली-एनसीआरमधील 32, पंजाबमधील 65 तर राजस्थानमध्ये 18 ठिकाणी छापेमारी