तिरुवअनंतपुरम Case against Union Minister Rajeev Chandrasekhar : केरळ पोलिसांनी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर द्वेषपूर्ण पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजीव चंद्रशेखर हे कलमसेरी बॉम्बस्फोटावर केलेल्या एका वक्तव्यामुळं वादात सापडले आहेत. त्यांनी X (पुर्वीच ट्विटर) वर द्वेष पसरवण्याचं काम केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर आयपीसीच्या कलम 153 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर काय म्हणाले केंद्रीय मंत्री : कोचीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर लगेचच केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तुष्टीकरणाचं राजकारण केल्याबद्दल केरळच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन दिल्लीत इस्रायल-हमास युद्धाचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याचा दाखला देत चंद्रशेखर यांनी लिहिलं की, 'दिल्लीत बसून ते इस्रायलचा निषेध करत आहेत. तर केरळमध्ये निर्दोष ख्रिश्चनांवर हल्ले आणि बॉम्बस्फोट केले जात आहेत. कारण दहशतवाद्यांना हमासच्या माध्यमातून जिहाद पुकारण्यास सांगितले जात असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
मुख्यमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोचीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पिनाराई विजयन म्हणाले होते, जे विषारी आहेत ते विष ओतत राहतील. मात्र, हे सांगताना त्यांनी थेट केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं नाव घेतलं नाही. ते पुढं म्हणाले होते, 'एका केंद्रीय मंत्र्यानं म्हटलंय की मी तुष्टीकरणाचं राजकारण करतोय. इस्रायलचा निषेध करत आहे.' विजयन पुढं म्हणाले, 'ते मंत्री आहेत आणि त्यांनी निदान तपास यंत्रणांबद्दल तरी आदर दाखवायला हवा. अशा गंभीर घटनेचा तपास अजूनही सुरू आहे. अजून सुरुवातीचा टप्पा असून काही लोकांना टार्गेट करण्यासाठी ते अशी विधानं करत आहेत. ते त्यांच्या जातीय अजेंड्यावर आधारित आहे. पण केरळमध्ये असा कोणताही अजेंडा नाही. केरळ नेहमीच जातीयवादाच्या विरोधात उभं राहिलंय. अशा शब्दांत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा :
- Kerala Blast : केरळमधील बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण भारतात हाय अलर्ट; NSG, NIA च्या टीम तपासासाठी पोहचल्या
- Anurag Thakur on the Kerala Story: मी कोणत्याही राज्याला म्हणत नाही की 'द केरळ स्टोरी सिनेमा' करमुक्त करा, पण किमान...
- Kerala Blast : केरळमध्ये ज्या प्रार्थनास्थळी हल्ला झाला, त्याचे अनुयायी ना येशू ख्रिस्ताला मानत, ना कोणत्याही देशाचं राष्ट्रगीत गात!