हैदराबाद :पाकिस्तानातील जनता महागाईचा सामना करत आहे. ही महागाई केवळ खाद्यपदार्थांवरच नाही, तर इतर सर्वच वस्तूंवरही दिसून येत आहे. अलीकडेच, पाकिस्तान सरकारने कारसाठी सामान्य विक्री कर (GST) वाढवला आहे. सरकारने 1400cc किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या गाड्यांवरील जनरल सेल्स टॅक्स (GST) 18 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, त्यानंतर येथे कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानमधील रखडलेल्या कर्ज कार्यक्रमाला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जरी पाकिस्तानमध्ये अनेक ब्रँडच्या कार विकल्या जातात, परंतु काही कार ब्रँड भारतात तसेच पाकिस्तानमध्ये विकल्या जातात. आज आम्ही भारतातील या कार ब्रँडच्या किमतीची पाकिस्तानमधील किंमतीशी तुलना करणार आहोत.
मारुती सुझुकी अल्टो :मारुती सुझुकी भारतात आपली सर्वात स्वस्त कार Maruti Suzuki Alto 800 ची विक्री 3.53 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत करते, तर त्यात 796cc इंजिन आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये विकली जाणारी अल्टो फक्त सुझुकी अल्टोच्या नावावर विकली जाते, ज्यामध्ये 660cc इंजिन उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये या कारची किंमत 21.44 लाख पाकिस्तानी रुपये आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे 6.28 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर :मारुती सुझुकी वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय कार आहे, जी मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप आवडते. भारतात, 2019 मध्ये याला फेसलिफ्ट अपडेट प्राप्त झाले होते. आता या कारची किंमक 5.52 लाख (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, ही कार पाकिस्तानमध्ये सुझुकी वॅगनआर नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही कार पाकिस्तानात 30.62 लाख रुपयाला विकली जात आहे. तीची किंमत भारतीय चलनात सुमारे 8.97 लाख रुपये आहे.