महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

cargo ship sunk : साहिबगंजमधील गंगा नदीत मालवाहू जहाज बुडाले - 9 हाईवा ट्रक बुडाले

झारखंड मधिल साहिबगंजमध्ये मालवाहू जहाज (cargo ship) गंगेत उलटल्याची मोठी दुर्घटना घडली (cargo ship sunk in river ganga in sahibganj) आहे. जहाज उलटल्यामुळे जहाजातील 9 हाईवा ट्रक बुडाल्याचे समोर येत आहे. या घटनेत अनेक लोक बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे.

cargo ship sunk
मालवाहू जहाज बुडाले

By

Published : Mar 25, 2022, 10:04 AM IST

साहिबगंज: आंतरराज्य फेरी सेवा घाट साहिबगंज आणि मनिहारी दरम्यान चालणारे एक मालवाहू जहाज बुडाले आहे. गुरुवारी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान हा अपघात झाला. गंगेत जहाज उलटल्यानंतर दगड आणि चिप्सने भरलेले हाईवा गंगेत बुडाले. वाहनांमधील चालक व मदतनीस यांचाही बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुफसिल पोलिस तेथे पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच बचावकार्यही सुरु करण्यात आले असून लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सरु आहेत. रात्रीच्या वेळी मालवाहू जहाज चालवणे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीरपणे पैसे कमावण्यासाठी रात्री प्रमाणापेक्षा जास्त ट्रक आमि हायवा नेल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. गंगेच्या मध्यभागी जोरदार वाऱ्यामुळे जहाज डगमगू लागले. या घटनेत अनेक लोक मारले गेल्याची भिती व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details