हैदराबाद - शहरातील एलबी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या टाटा मोटर्स शोरूममधील एक कार खाली कोसळल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरून ही कार कोसळली. त्यामुळे कार खरेदी करण्यासाठी आलेला एक व्यक्ती आणि त्याच्या मुलाला किरकोळ जखम झाली आहे. अलकापुरी जंक्शन जवळ असलेल्या या शो रूमचा व्हिडिओ समोर आलेला आहे.
VIDEO : शो-रूमच्या पहिल्या मजल्यावरून कार पडली खाली - एलबी नगर टाटा मोटर्स शोरूम
हैदराबादमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. शो रूमच्या पहिल्या मजल्यावरून कार खाली पडल्याने दोनजण जखमी झालेत
कार पडली खाली
पहिल्या मजल्यावरू पडली कार -
शोरूमच्या पहिल्या मजल्यावर ही कार होती. कारला बघण्यासाठी काही ग्राहक आले होते. त्यादरम्यान ही घटना घडली. यामध्ये दोघेजण जखमी झालेत. तसेच अलकापुरी जंक्शन वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. टाटा मोटर्सच्या व्यवस्थापकांवर निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांनी केला आहे.